Friday, March 29, 2024
Homeठळक घडामोडीएलआयसी कट्टा जेष्ठ नागरीक संघातर्फे कैलास स्मशानभूमीस आर्थिक मदत

एलआयसी कट्टा जेष्ठ नागरीक संघातर्फे कैलास स्मशानभूमीस आर्थिक मदत

साताराः सातारा येथील भवानी पेठेतील ङखउ कट्टा नावाने ओळखल्या जाणार्‍या जेष्ठ नागरीक संघातर्फे श्री बालाजी चॅरिटेबल ट्रस्ट व लोक सहभागातून संगम माहूली येथे उभारलेल्या कैलास स्मशानभूमीस भरीव आर्थिक मदत करण्यात आली. 
बी.जी. जोशी यांच्या पुढाकाराने निधी गोळा करण्यात आला. यावेळी आपले मनोगत व्यक्त करताना बी.जी.जोशी यांनी संगममाहूली येथील कैलास स्मशानभूमी महाराष्ट्रतच नव्हे तर संपूर्ण देशात आदर्शवत असून बांधकाम उत्कृष्ंठ दर्जाचे असून गेली 15 वर्ष स्वच्छता,निटनिटकेपणा त्याच बरोबर सोयी सुविधा अत्यंत चांगल्या प्रकारे राबवित असल्याबद्दल श्री बालाजी चॅरिटेबल ट्रस्टचे कौतुक केले. तसेच कोणत्याही प्रकारचे शासकीय,निमशासकीय अनुदान मिळत नसताना दानशुर देणगीदार व ट्रस्टच्या माध्यमातून गेली 15 वर्षे देखभाल करत असून सातारकर व परिसरातील नागरिक यांचे सहकार्य लाभत असल्याबद्दल त्यांनी सर्वांनाच धन्यवाद दिले.
श्री बालाजी चॅरिटेबल ट्रस्टचे संस्थापक राजेंद्र चोरगे यांनी यावेळी कैलास स्मशानभूमीत अंत्यसंस्कार केले जात आहेतच परंतु याठिकाणी प्रबोधनात्मक फलक लावून व्यसनमुक्ती तसेच अंत्यविधीसाठी शेणीचा वापर केल्यामुळे मोठ्या प्रमाणात वृक्ष संवर्धन होत आहे तसेच प्रदुषणाचे प्रमाण कमी झाले आहे. 
ाधुनिक तंत्रज्ञानाचा वापर अर्थात सीसीटिव्ही याठिकाणी बसविले असून अंत्यविधीसाठी उपस्थित राहू न शकणार्‍या लोकांना अंत्यविधी पाहता यावा यासाठी ऑनलाईन थेट प्रक्षेपण पाहण्याची सुविधा उपलब्ध असल्याचे माहिती उपस्थितांना दिली व ङखउ कट्टा जेष्ठ नागरीक संघाचे आभार मानले.
यावेळी श्री बालाजी चॅरिटेबल ट्रस्टचे उदय गुजर,राजेंद्र खंडेलवाल,दिपक मेथा,नितीन माने,संतोष शेंडे आणि पदाधिकारी उपस्थित होते.

Chandrasen Jadhav
Chandrasen Jadhavhttp://GramodhharNews.com
Continuing family legacy of Dainik Gramodhhar Chandrasen Jadhav has been associated with it since last 6 years. He is the Chief Editor & looks after Online News Edition of GramodhharNews.com operated from Satara.
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular