Saturday, June 21, 2025
Homeठळक घडामोडीपत्रकार प्रगती पाटील यांनी 3 वेळा लाडली मिडीया पुरस्कार मिळवून जिल्ह्याचा नावलौकिक...

पत्रकार प्रगती पाटील यांनी 3 वेळा लाडली मिडीया पुरस्कार मिळवून जिल्ह्याचा नावलौकिक वाढविला : किशोर बर्गे

कोरेगांव : स्त्री पुरूष समानतेच्या क्षेत्रात काम करणार्‍या पॉप्युलेशन फस्ट या संस्थेच्या वतीने लाडली मिडीया अ‍ॅवार्ड 2017 हा राष्ट्रीय स्तरावरील पुरस्कार प्रख्यात पत्रकार पी. साईनाथ यांचे हस्ते सातारा येथील पत्रकार प्रगती पाटील यांना दिल्ली येथे सभारंभपुर्वक प्रदान करण्यात आला. या पुरस्काराने सातारा जिल्हयातील सर्वांचे मन अभिमानाने भरून आले. कोरेगांव शहर मंचचे वतीनेही हा आनंद सोहळा साजरा करणेत आला.
यावेळी मंचचे अध्यक्ष व कोरेगांव तालुका खरेदी विक्री संघाचे संचालक किशोर बर्गे यांचे हस्ते बुके व पुस्तके भेट देवून सत्कार करणेत आला.
याप्रसंगी किशोर बर्गे म्हणाले, पॉप्युलेशन फस्ट या राष्टीय संस्थेच्या वतीने दिला जाणारा सन्मानाचा लाडली मिडीया पुरस्कार प्रख्यात पत्रकार पी. साईनाथ यांचे हस्ते पत्रकार प्रगती पाटील यांनी मिळवून सातारा जिल्हयाचा नांवलौकिक वाढविला. त्यांना हा पुरस्कार 2012, 2015 व 2017 असा तिन वेळा मिळाला असून राष्टीय स्तरावरील असे पुरस्कार मिळविण्याची त्यांनी हॅट्रीक साधली आहे.
पोटातल्या मुलीसह आईने केलेलं स्टिंग हा त्यांचा एप्रिल 2017 मध्ये प्रसिध्द झालेला लेख खरचं प्रत्येकाला बोध देणारा होता. त्यांचे लेख प्रत्येकजण बारकाईने वाचत असतो. त्याचे राष्टीय पातळीवर मुल्यांकन झाले ही बाब सर्व सातारावासीयांना अभिमानाची आहे.
या पुरस्कारबद्दल आम्ही त्यांचे अभिनंदन करतो. व अशीच यशाची शिखरे पाटील यांचेकडून सर व्हावीत यासाठी मंचचे वतीने हार्दीक शुभेच्छा देतो.
 सातारा जिल्हयाचे नांव राष्टीय पातळीवर सतत उंचावेल अशी उर्जा आपणास लाभावी अशी अपेक्षा करतो.
प्रगती पाटील यांनी सत्काराबद्दल कृतज्ञता व्यक्त करून कोरेगांव शहर विकास मंचने केेलेल्या सत्काराने मला नवीन उर्जा मिळाली आहे. असेच आपण आमचे पाठीशी उभे राहावे जेणेकरून आमच्या लेखनीस ताकद मिळेल. आपल्या मानसांनी केलेले कौतुक कायम स्मरणात राहील. अशा भावना व्यक्त करून धन्यवाद दिले.
या कार्यक्रमास रामचंद्र बोतालजी, कार्याध्यक्ष दिलीपराव बर्गे, तसेच इतर सहकारी  उपस्थित होते.
Chandrasen Jadhav
Chandrasen Jadhavhttp://GramodhharNews.com
Continuing family legacy of Dainik Gramodhhar Chandrasen Jadhav has been associated with it since last 6 years. He is the Chief Editor & looks after Online News Edition of GramodhharNews.com operated from Satara.
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular