Friday, June 20, 2025
Homeठळक घडामोडीरान गव्याच्या हल्ल्यात महिला जखमी

रान गव्याच्या हल्ल्यात महिला जखमी

 

पाटण:-   पाटण तालुक्यात बिबट्याचा धुमाकूळ सुरू असतानाच मौजे शिरळ येथे सोमवारी दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास  सांबर गौंड नावाच्या  शेतात जनावरे चारत असतानाच लक्ष्मीबाई  धोंडीराम मोहिते वय ५७ वर्षे, राहणार शिरळ या महिलेवर  रानगव्याने  हल्ला करुन जखमी केले आहे. सदर महिलेवर पाटण ग्रामीण रुग्णालयात प्राथमिक उपचार केल्यानंतर पुढील उपचारासाठी उप जिल्हा रुग्णालय कराड येथे नेण्यात आले. मात्र जबड्याला जबर मार लागल्याने पुढील उपचारासाठी कृष्णा रुग्णालय कराड येथे पाठविणेत आले. सदर रानगवा पिसाळलेला असल्याचे स्थानिक ग्रामस्थांनी सांगितले त्यामुळे शिरळ गाव व परिसरातील नागरिकाच्यात मनात भितीचे वातावरण निर्माण झाले आहे.
दरम्यान याबाबतची माहिती मिळताच पाटण वनविभागाचे वनअधिकारी विलास काळे यांनी वन कर्मचारी यांना तातडीने पंचनामा करण्याचे आदेश देऊन स्वत:  उप जिल्हा रुग्णालय कराड येथे जाऊन जखमी महिलेची विचारपुस केली. जखमी महिलेच्या जबड्याला जबर मार लागल्याने महिलेच्या तोंडातील दात तुटले आहेत. जबड्यावर शस्त्रक्रिया करावी लागणार असल्याने वनअधिकारी विलास काळे यांनी या महिलेला पुढील उपचारासाठी कृष्णा रुग्णालय कराड दाखल केले.

Chandrasen Jadhav
Chandrasen Jadhavhttp://GramodhharNews.com
Continuing family legacy of Dainik Gramodhhar Chandrasen Jadhav has been associated with it since last 6 years. He is the Chief Editor & looks after Online News Edition of GramodhharNews.com operated from Satara.
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular