पाटण :- महाराष्ट्र राज्य स्वाभिमानी नाभिक संघटना व समस्त नाभिक समाज पाटण तालुका यांच्या वतीने ढेबेवाडी येथे दिनांक ९ आक्टोंबर रोजी वीर जिवाजी महाले यांची जयंती विविध कार्यक्रमांनी साजरी करण्यात येत आहे, जयंती उत्सवानिमित्त ढेबेवाडी विभागात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे ,
तत्पूर्वी सोमवार दिनांक ८ रोजी सकाळी दहा वाजता किल्ले प्रतापगडावर छत्रपति शिवाजी महाराज व वीर जिवाजी महाले यांना अभिवादन करून गडावरून ज्योत पेटवून प्रस्थान केले जाईल मंगळवार दिनांक ९ रोजी सकाळी सहा वाजता ढेबेवाडी विभागातील काढणे या गावांमध्ये ज्योती चे आगमन होऊन त्या ठिकाणी ग्रामस्थ बंधू भगिनी यांच्या वतीने स्वागत करण्यात येईल नंतर मानेगाव येथे पूजन करून तळमावले येते ज्योती चे आगमन झाल्यानंतर मिरवणूक काढण्यात येईल, त्याठिकाणी मर्दानी खेळ दांडपट्ट्यांचे प्रात्यक्षिक होईल तद्नंतर खळे गुडे मालदन फाटा येथे ज्योतीचे पूजन करून वीर जिवाजी महाले यांच्या प्रतिमेला अभिवादन करून तळमावले ते ढेबेवाडी पर्यंत मिरवणूक काढण्यात येईल त्यानंतर ढेबेवाडी येथील चंद्रमणी बुद्ध विहार या ठिकाणी सांगता सभा होईल ,
या कार्यक्रमास स्वाभिमानी नाभिक संघटनेचे राज्य सरचिटणीस मंगेश काशीद , जिल्हाध्यक्ष माधवराव राऊत, जिल्हा कार्याध्यक्ष रामभाऊ पवार ,पश्चिम महाराष्ट्र प्रसिद्धी प्रमुख सुनील चव्हाण, पश्चिम महाराष्ट्र संघटना प्रमुख प्रदीप काशीद, पाटण शहर अध्यक्ष बाबुराव पवार पाटण शहर खजिणदार नितीन पवार आधी पदाधिकारी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार असून हा कार्यक्रम स्वाभिमानी नाभिक संघटना संस्थापक राज्य अध्यक्ष समाज भूषण शंकरराव गायकवाड साहेब यांच्या अध्यक्षतेखाली तसेच संघटनेचे पाटण तालुका अध्यक्ष अधिक राव चव्हाण यांच्या उपस्थितीत संपन्न होणार आहेत ,
तरी सदर कार्यक्रमास पाटण तालुक्यातील समाज बांधवांनी बहुसंख्येने उपस्थित राहावे असे आवाहन पाटण तालुका नाभिक संघटनेचे अध्यक्ष अधिक राव चव्हाण व वीर जिवाजी महाले जयंती महोत्सव कमिटीचे अध्यक्ष विठ्ठल कदम यांनी केले आहे
ढेबेवाडी येथे वीर जीवा महाले जयंती उत्सवाचे आयोजन
RELATED ARTICLES