पाठण:- ( शंकर मोहिते )- पाटण एस.टी. अगार येथुन एक-दिड वर्षा पुर्वी कायम सुरु असलेल्या लांब पल्याच्या एस.टी. बस, एस.टी.महामंडळाने बंद करुन प्रवाशांचे हाल तर पाटण आगाराचे अर्थिक नुकसान केले आहे. अशा या लांब पल्यांच्या एस. टी. बस मुळे पाटण आगाराला चांगले अर्थिक अर्निगं सुरु होते. येथिल प्रवाशांचे हाल व नुकसान करुन खाजगी तत्वावर चालणाऱ्या शिवशाही बसला अर्थिक फायदा मिळवुन देण्यासाठी पाटण आगारातुन लांब पल्याच्या एस.टी. बस बंद करण्यात आल्या आहेत. एस.टी. महामंडळाच्या या अनागोंदी कारभाराविरोधात व पाटण आगारातुन पुर्वी सुरु असणाऱ्या लांब पल्याच्या एस. टी. बस पुन्हा पुर्वरत २४ नोव्हेंबर अखेर सुरु करण्यासाठी पाटण तालुका पत्रकार संघाने पाटण आगार व एस.टी. महामंडळाला निवेदन दिले आहे. अन्यथा प्रवाशी, नागरीक, विद्यार्थी सर्व पक्षिय कार्यकर्ते पदाधिकारी यांना बरोबर घेऊन पाटण एस. टी. आगार येथे शिवशाही बसला अटकाव करणार असल्याचा ईशारा या निवेदनात दिला आहे.
पाटण आगारातुन , पाटण-पुणे, वल्लभनगर, पिपंरी, मुंबई, सोलापुर, कोल्हापुर, शिर्डी, सांगली अशा एस.टी. बस सुरु होत्या. या एस.टी. बस मुळे पाटण व तालुक्यातील प्रवासांचा या शहरा पर्यंत डायरेक्ट प्रवास होत होता. आणि पाटण आगाराला मोठा अर्थिक नफा ही होत होता. मात्र पाटण एस.टी. अगारातुन या लांब पल्याच्या एस.टी बस बंद करुण प्रवाशांची गैरसोय तर पाटण अगाराचे अर्थिक नुकसान केले आहे. या लांब पल्याच्या एस.टी. बस बंद करुन सातारा, उंब्रज, कराड येथे अर्ध्या-अर्ध्या तासाला लोकल एस.टी.बस सुरु केल्या आहेत. पुणे, सोलापुर, सांगली, कोल्हापूर येथे जाणाऱ्या प्रवाशानां पाटण आगारातुन डायरेक्ट एस.टी. बस नसल्याने या प्रवाशांना सातारा, उंब्रज, कराड येथ पर्यंत लोकल बसने प्रवास करुन वेळ वाया घालवावा लागतो. व येथून पुढे बस बदलुन दुसऱ्या आगाराच्या लांब पल्याच्या एस.टी. ने प्रवास करावा लागतो. प्रवाशी एकटा असेल तर हा प्रवास तो कसाही करेल मात्र त्याच्या सोबत त्याचे कुटूंब, लहान मुले साहित्य असल्यास हा प्रवास करताना त्याला तारेवरची कसरतच करावी लागते. एस.टी. महामंडळाच्या या चुकीच्या कारभारावर अनेक सामाजिक संस्था, संघटना, राजकीय पक्ष्यांनी बंद केलेल्या एस.टी. पुन्हा पुर्वरत सुरु करण्याची मागणी केली होती. आणि विवीध व्रुतपत्रातून या संबधात आवाज उठविला होता. तरी देखिल एस.टी. महामंडळाने प्रवाशांच्या मागणीकडे सोयीस्कर दुर्लक्ष केले.
पाटण येथुन पुणे ला दिवसातुन चार एस.टी. बस सुरु होत्या. या चार ही बस पाटण अगाराला मोठे अर्थिक नफा मिळवूण देत होत्या. तरी देखिल एस.टी. महामंडळाच्या चुकीच्या धोरणामुळे खाजगी शिवशाही बसला फायदा मिळवूण देणेसाठी पाटण अगारातुन पुणे एस.टी. बस बंद केल्या. याचा फटका इथल्या प्रवाशांना बसत असून प्रवासाचा त्रास हि सहन करावा लागत आहे. कोकनातुन पाटण मार्गे पुणे, शिर्डी, सोलापुर, पंढरपुर कडे जाणाऱ्या आणि पुणे, सोलापुर, शिर्डी, पंढरपुर कडून पाटण मार्गे कोकनात जाणाऱ्या शिवशाही बसनां पाटण हे औनलाईन बुकींगच नाही. मात्र पाटण हा थांबा आहे. म्हणजे शिवशाही बसने पुण्याकडून पाटणला येणाऱ्या प्रवाशाला पाटण हे तिकीट न देता कोयना तिकीट घेऊन पाटणला उतरावे लागते. कोकनातुन येणाऱ्या शिवशाही बसनां पाटण तिकीट न घेता सातारा, कराड तिकीट घेऊन पाटणला उतरावे लागते हि शिवशाही बस कडून प्रवाशांची चाललेली लुट असून. पाटण एस.टी. आगाराचे नुकसान करुन शिवशाही बस फायद्यात आनण्याचा एस.टी. महामंडळाचा घाट आहे. प्रवाशांच्या मनाचा विचार करुण पाटण आगारातुन लांब पल्याच्या एस.टी. बस २४ नोव्हेंबर अखेर पुन्हा सुरु करण्यात याव्यात. अन्यथा प्रवाशांना व नागरीकांना बरोबर घेऊन पाटण येथुन सर्व शिवशाही बसना अडकाव करण्यात येईल. असा ईशारा पाटण तालुका पत्रकार संघाने निवेदनाव्दारे एस.टी. महामंडळ व पाटण एस.टी. आगार यांना दिला आहे. निवेदन देताना यावेळी पत्रकार संघाचे अध्यक्ष भगवंत लोहार, उपाध्यक्ष नितीन खैरमोडे, दिनकर वाईकर, सचिव विद्या नारकर, माजी अध्यक्ष शंकर मोहिते, बाळासाहेब पवार, विक्रांत कांबळे, जालिंदर सत्रे, जयभिम कांबळे, संजय कांबळे, प्रकाश कांबळे, संदेश बनवसोडे, बाबासो सुतार, सिताराम पवार आदी पत्रकार उपस्थित होते.