Monday, June 23, 2025
Homeठळक घडामोडीताईगडेवाडी येथील शाळेला कुंडया देवून वाढदिवस साजरा

ताईगडेवाडी येथील शाळेला कुंडया देवून वाढदिवस साजरा

ताईगडेवाडी येथील शाळेला कुंडया देवून वाढदिवस साजरातळमावले: पाटण तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा ताईगडेवाडी येथील इ.3 री मध्ये शिकत असलेल्या आर्यन दिलीप बोत्रे या चिमुरडयाने आपल्या वाढदिवसानिमित्त शाळेला कुंडया देवून अनोख्या शुभेच्छा दिल्या.उपक्रमशील शाळा म्हणून कुंभारगांव बीट मध्ये तळमावले या शाळेचा आर्वजून उल्लेख केला जातो. या शाळेत इ.3 रीमध्ये आर्यन दिलीप बोत्रे हा चिमुरडा ज्ञानाचे धडे गिरवत आहे. त्याचा वाढदिवस नुकताच संपन्न झाला. या वाढदिवसादिवशी वायफळ खर्च न करता त्या खर्चाऐवजी शाळेला शोभा देणारी झाडे लावण्यासाठी कुंडया देण्याचा निर्णय त्याच्या पालकांनी घेतला. आई शोभा बोत्रे आणि वडील दिलीप बोत्रे यांनी 2 आकर्षक कुंडया खरेदी केल्या आणि वाढदिवसादिवशी प्रार्थनेच्यावेळी सर्व विद्यार्थी आणि शिक्षकांच्यासमक्ष त्या शाळेला भेट दिल्या. या त्यांच्या भेटीचे प्राथमिक शाळेतील शिक्षकांनी कौतुक केले. या प्रसंगी केंद्रप्रमुख उत्तम घाडगे, शाळेचे मुख्याध्यापक राजाराम साळुंखे, यशवंत दिवेकर सर व इतर सहकारी शिक्षक उपस्थित होते. शोभा बोत्रे या गुढे ग्रामपंचायतीच्या विद्यमान सदस्या आहेत. त्यांच्या आणि त्यांचे पती दिलीप बोत्रे व परिवाराच्या संकल्पनेतून हा आगळावेगळा वाढदिवस साजरा केला गेला. या वाढदिवसाची चर्चा संपूर्ण शाळेमध्ये रंगली होती. प्रत्येक विद्यार्थ्याने आपला वाढदिवस असा नावीण्यपूर्ण संकल्पनेने साजरा करावा असे आवाहन याप्रसंगी शिक्षकांनी केले.

Chandrasen Jadhav
Chandrasen Jadhavhttp://GramodhharNews.com
Continuing family legacy of Dainik Gramodhhar Chandrasen Jadhav has been associated with it since last 6 years. He is the Chief Editor & looks after Online News Edition of GramodhharNews.com operated from Satara.
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular