म्हासुर्णे : (तूषार माने म्हासुर्णे प्रतिनिधी) म्हासुर्णे ता. खटाव येथील श्रीराम विद्यालय म्हासुर्णे येथे १९८९-९० सालच्या इयत्ता दहावीच्या माजी विद्यार्थीनी व विद्यार्थी यांनी सर्वानी मिळुन स्नेहमेळावा आयोजित केला होता.यानिमित्ताने शालेय जीवनास पुन्हा एकदा उजाळा मिळाला आहे.
प्रथम सरस्वतीच्या प्रतिमेचे पुजन कार्यक्रमाचे अध्यक्ष शिक्षण सल्लागार मंडळाचे चेअरमन महादेव माने, प्रमुख पाहुणे प्रा.ज्ञानेश्वर माने सर तर सरपंच सचिन माने,सेक्रेटरी राजाराम माने,ग्रामपंचायत सदस्य तुषार माने,शहा सर,अशोक माने,अर्जुन यमगर,आप्पासो माने, यांची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी १९८९-९० च्या बँचला शिकवणारे त्यावेळीचे शिक्षक व शिक्षिकांनी हजेरी लावली होती. यामध्ये माजी मुख्याध्यापक शहा सर,काकडे सर,माने सर,मगर सर,दबडे सर,जे.वाय.सर,शिंदे सर,निकम मँडम,औंधकर मँडम ,या माझी शिक्षकांनाचा व क्लार्क बाळासो माने व शिपाई मोहन तोरणे,हरिदास सांळुखे,दत्ता पवार,दिलीप कोळी या सर्व माजी गुरुजनांचा माजी विद्यार्थी यांच्या कडुन शाल,फेटा,श्रीफळ व छ.शिवाजी महाराज फोटो देऊन केला.
गेल्या दोन महिन्यापुर्वीपासुन या कार्यक्रमाचे नियोजन करण्यासाठी एक व्हाट्सअप्प ग्रुप बनवण्यात आला होता.यामध्ये अनंत कुभार,डी.एल.जाधव,डी.एल.महाडीक,उत्तम चव्हाण,हरी यमगर,वसुंधरा मगर,सिमा माने,राजश्री दबडे,अमोल निकम,विनायक औंधे या सर्वानानी आपल्या जुन्या मित्राना ग्रुपच्या माध्यमातुन एकत्र आणले.या सोशल मिडीयाच्या आधुनिकतेचा वापर करुन देशाच्या नव्हे तर परदेशात असणाऱ्या आपल्या जुन्या मित्र मैत्रीणींना या कार्यक्रमाचे निमत्रंण देण्यात आले यावेळी उपस्थितांचे स्वागत माजी विद्यार्थी व विद्यार्थीनीनी केले
एकत्र आलेल्या १९८९-९० सालातील सर्व माजी विद्यार्थी- विद्यार्थीनीनी शाळेला इयत्ता नववीचा रुप डिझीटल करुन दिला व गरीब व गरजु विद्यार्थ्यांना १२ डझन वह्या भेट म्हणून दिल्या.आपण ज्या शाळेत लहान पणापासुन शिकलो व याच शाळेमुळे आपण घडलो म्हणून एक आठवण म्हणून सर्वानी एक मोठी जबाबदारी ओळखुन नववीची रुम डिझीटल करुन इंटरनेटच्या युगात देश पुढे वाटचाल करत असताना आपल्या शाळेत शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांना याचा फायदा व्हावा या हेतुने नववीचा रुम डिझीटल करुन देवुन इतरांच्या समोर एक आदर्श निर्माण केला.व सर्व उपस्थितीतांना स्नेहभोजन ठेवले होते. यावेळी माजी शिक्षक शहा सर,निकम मँडम व माजी विद्यार्थी दादासो महाडीक,राजश्री दबडे,डि.एल.जाधव यांनी आपल्या आठवणी सर्वाच्या समोर कथन केल्या. या कार्यक्रमावेळी शिक्षण सल्लागार मंडळाचे संचालक रामचंद्र माने,किसन माने,पांडुरंग माने,भिमराव माने,स्वप्निल माने,गोरख माने,नथुराम माने,आर जी.कुलकर्णी ,व्हा.एल.सर, ग्रामपंचायत सदस्या सौ.सगिता गुरव, शाळेचे मुख्याध्यापक पी.व्हि.हांडेसर,एस.के.राठोड सर, व्हा.एम माने मँडम,एस.बी.म्हमाणे मँडम,पी.डी.परदेशी सर,बी.आर.शेख सर,पी.बी.तोरणे,ए.टी.केराम सर जे.देशमुख सर,विजय गुरव ,नितिन माने,चंद्रकांत सुतार म्हासुर्णेतील ग्रामस्थ व शिक्षक विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.प्रास्तविक एस.के.राठोड सर व व्हि.एम.माने मँडम यांनी केले तर आभार उपशिक्षिका एस .बी.म्हमाणे मँडम यांनी मानले.
म्हासुर्णे येथे माजी विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा उत्साहात ; शालेय जिवनातील आठवणींना माजी विद्यार्थ्यांनी दिला उजाळा
RELATED ARTICLES