Monday, June 23, 2025
Homeठळक घडामोडीनवलेवाडी, शिंदेवाडी तलाठ्याविरोधात दि. 1 रोजी आत्मदहन

नवलेवाडी, शिंदेवाडी तलाठ्याविरोधात दि. 1 रोजी आत्मदहन

नवलेवाडी, शिंदेवाडी तलाठ्याविरोधात दि. 1 रोजी आत्मदहन
वडूज : खटाव तालुक्यातील नवलेवाडी, शिंदेवाडी सजाचे गांवकामगार तलाठी हिरके यांच्या अनागोंदी कारभाराची चौकशी करावी या मागणीसाठी मंगळवार दि. 1 जानेवारी रोजी नवलेवाडी येथील अल्ताफ रहिम शेख व त्यांचे कुटुंबिय सातारा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आत्मदहन करणार आहेत.
याबाबत जिल्हाधिकार्‍यांना दिलेल्या निवेदनातील माहिती अशी, श्री. शेख यांच्या मालकीची नवलेवाडी, शिंदेवाडी गांवच्या हद्दीत वडिलार्जीत जमीन आहे. त्यांचे कुटुंबिय नोकरी व्यवसायानिमित्त अहमदनगर येथे गेली अनेक वर्षे वास्तव्यास आहे. याचा गैरफायदा घेवून त्यांच्या नात्यातील एका व्यक्तीने शेख यांच्या कुटुंबियांस परागंदा दाखवून महसूल यंत्रणेस हाताशी धरुन अयोग्य पध्दतीने कुळ कायदा कलम 32 (ग) खाली तहसिलदारांच्या मार्फत 3963 नंबरचा फेरफार बदल करुन घेतला. त्याविरोधात शेख यांनी उपविभागीय कार्यालयाकडे दादा मागितली. त्यानंतर सदर कार्यालयाने मुळ प्रकरण चौकशीकरीता पुन्हा तहसिलदार कार्यालयाकडे पाठविले. तहसिलदारांनी शेख यांच्या बाजूने निकाल दिला. तद्नंतर शेख यांनी जमीन नोंद व अन्य तांत्रिक बाबींच्या नोंदीसंदर्भात गांवकामगार तलाठ्यांच्याकडे अर्ज दिला.
मात्र तलाठ्यांच्याकडून जाणीवपूर्वक टाळाटाळ होवू लागल्याचे लक्षात येताच शेख यांनी त्यांना काही चिरीमिरीही दिली. तरीही वाढीव अपेक्षेने ते नोंद करण्यास टाळाटाळ करत आहेत. त्यामुळे त्यांच्यावर दफ्त दिरंगाई कायद्याचे उल्लंघन केल्याप्रककरणी कारवाई व्हावी.
तसेच आपल्या वडिलार्जीत जमीनीच्या रितसर नोंद व्हाव्यात या मागणीसाठी श्री. शेख यांच्यासह, रजिया शेख, शमीम शेख, रुखसाना शेख हे चारजण नववर्षाच्या पहिल्याच दिवशी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आत्मदहन करणार आहेत.याबाबत तहसिलदार जयश्री आव्हाड यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की, या प्रकरणात नक्की काय आहे ते पाहून खात्री करते. तसेच तांत्रिक अडचणीमुळे प्रकरण रखडले असेल तसेच संबंधित तलाठी आपल्या कर्तव्याबाबत जागृत असल्याचे आपल्या निदर्शनास आले आहे.

Chandrasen Jadhav
Chandrasen Jadhavhttp://GramodhharNews.com
Continuing family legacy of Dainik Gramodhhar Chandrasen Jadhav has been associated with it since last 6 years. He is the Chief Editor & looks after Online News Edition of GramodhharNews.com operated from Satara.
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular