Sunday, June 22, 2025
Homeठळक घडामोडीचिमुकल्या अराफात मुळे सातार्‍याचा नावलौकिक वाढलाः आ. शिवेंद्रसिंहराजे

चिमुकल्या अराफात मुळे सातार्‍याचा नावलौकिक वाढलाः आ. शिवेंद्रसिंहराजे

साताराः जगात सर्वांनाच वेगाचे वेड लावणार्‍या फॉर्मुला वन प्रमाणेच लहान मुलांसाठी असलेल्या आंतरराष्ट्रीय स्तरावरील गोकार्ट स्पर्धेत आपल्या सातार्‍यातील चिमुकला अराफात सईद शेख हा सलग तिसर्‍यांदा सहभागी होत आहे. अराफात हा भारतातील सर्वात छोटा रेस ड्रायव्हर ठरला असून दुबई येथे जानेवारी 2019 मध्ये होणार्‍या स्पर्धेसाठी त्याला शुभेच्छा देतानाच, अराफात मुळे सातार्‍याचा नावलौकिक वाढला असून आगामी स्पर्धेतही तो यश संपादन करेल, असा विश्‍वास आ. श्रीमंत छ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी व्यक्त केला.
मुळचा सातारा शहरातील रहिवाी असलेला अराफात शेख हा पुणे येथे इयत्ता पहिलीमध्ये शिक्षण घेत आहे. त्याचे वडील सईद शेख यांच्या प्रेरणा आणि मार्गदर्शनातून अराफात हा गो कार्टींगमध्ये निपून झाला आहे. दुबई येथे दि. 18 व 19 जानेवारी 2019 रोजी होणार्‍या आएएएमई एक्स 30 युएई चॅम्पियनशीप या आंतरराष्ट्रीय स्पर्धेत तिसर्‍यांदा सहभागी होणारा तो सर्वात लहान रेसर असून त्याचा सरावही जोरदार सुरु आहे. दरम्यान, सातार्‍यात सुटीनिमीत्त आलेल्या अराफात याचे आ. शिवेंद्रसिंंहराजे यांनी भरभरुन कौतुक करुन स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या. यावेळी फिरोज पठाण, सईद शेख आदी मान्यवर उपस्थित होते.
अराफात याचे वडील सईद हे मोटार स्पोर्ट ड्रायव्हर असून त्यांनी भारतातील सर्कीट रेस, ऑफ रोड आणि ड्रॅग रेसप्रकारात त्यांनी यश संपादन केलेले आहे. लहानपणापासूनच रेसींगची आवड असणारा अराफात त्याच्या वडीलांकडूनच रेसींगचे धडे घेत असून भविष्यात भारतासाठी फॉर्मुला 1 मोटार ड्रायव्हर होण्याची त्याची प्रबळ इच्छा आहे.
आगामी स्पर्धेसाठी आणि भविष्यासाठी आ. शिवेंद्रसिंहराजे यांनी सातारकरांच्यावतीने शुभेच्छा दिल्या.

Chandrasen Jadhav
Chandrasen Jadhavhttp://GramodhharNews.com
Continuing family legacy of Dainik Gramodhhar Chandrasen Jadhav has been associated with it since last 6 years. He is the Chief Editor & looks after Online News Edition of GramodhharNews.com operated from Satara.
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular