कोरेगाव: कोरेगाव तहसील कार्यालयातील अनागोंदी कारभार सुधारण्याबरोबरच विविध मागण्यांसाठी भारतीय जनसंसदेतर्फे तहसील कार्यालयासमोर बुधवारी जनआंदोलन करण्यात आले.
तहसील कार्यालयातील बेकायदेशीर सेतू बंद करावा, विभक्त शिधापत्रिका वाटप त्वरित सुरु करावे, अभिलेख कक्षातील कामकाज सुरळीत करावे आणि शेतकर्र्यांना ऑनलाईन 7/12 उतारा बिनचूक मिळावा आदी मागण्यांसाठी जिल्हाध्यक्ष संजय माने यांच्या नेतृत्वाखाली तालुकाध्यक्ष रमेश माने, सुरेश येवले, चंद्रकांत कांबळे, शहराध्यक्ष प्रशांत गुरव, दादा माने, विष्णू शिखरे यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी जनआंदोलन केले.
भारतीय जनसंसदेचे विविध मागण्यांसाठी कोरेगावात आंदोलन
RELATED ARTICLES