सातारा : भारत देशाच्या सविंधानात देशाला नवी दिशा देण्याचे काम डॉ. बाबासाहेब आंबेडकरानी केले त्यांच्याच कार्याचे ध्येय उराशी बाळगून डॉ. अशोक शिलवंत सामाजिक काम करत आहेत. यापुढील काळात त्यांना ताकद देण्याचं काम करणार असल्याचे मत माजी केंद्रिय कृषी मंत्री शरदचंद्र पवार यांनी मांडले.
ठोमसे (ता. पाटण) येथे अशोक सर्वांगिण विकास सोसायटी निर्मिती बहुचर्चीत नवनिर्मित पॅगोडा लोकार्पन सोहळा शरद पवार यांच्या हस्ते संपन्न झाला. यावेळी पवार बोलत होते. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, माजी राज्यपाल श्रीनिवास पाटील, माजी मंत्री विक्रमसिंह पाटणकर, विद्याभुषण डॉ. प्रशांत पगारे, कामगार सुरक्षा दलाचे अध्यक्ष भगवानराव वैराट, रतनलाल सोनाग्रा, जि.प.अध्यक्ष संजिवराजे नाईक निंबाळकर, जि.प. शिक्षण सभापती राजेश पवार आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी पवार म्हणाले की, देशाच्या कानाकोपर्यात सामजिक भावना जागृत ठेवण्यासाठी मतभेद विसरुन सर्व जातिधर्मातील लोकांनी एकत्र येवून काम करण्याची गरज निर्मान झाली आहे एका छोट्याश्या ठोमसे गावात सर्व युगपुरुषाचे पुतळे उभारणी करण्याचे काम डॉ. अशोक शिलवंत यांनी केले असुन यापुढील काळात माझ्यावतीने या गावास विकासाच्या प्रवाहात आणण्यासाठी प्रयत्न होईल. ज्या समाजातील उपेक्षित घटकांना पुणे सारख्या ठिकाणी बँकेच्या माध्यमातून कर्जपुरवठा करण्याचं काम डॉ. अशोक शिलवंत करत आहेत.
माजी मंत्री पाटणकर म्हणाले की, माझ्या तालुक्यातील एका छोट्या गावात पवारसाहेबांचे पाय लागले यापुढील काळात हे गाव नव्या वळणावर नक्कीच असणार आहे.
यावेळी माजी राज्यपाल श्रीनिवास पाटील म्हणाले की, डॉ. अशोक शिलवंत हे आजच्या पिढीचे सामाजिक कामाची आस असणारे आयडॉल आहेत शिक्षणाचे माहेरघर असलेल्या पुण्यासारख्या ठिकाणी कुटुंबासमवेत राहून समाजकारणासह राजकारणात पाऊल ठेवून एका वेगळा सामाजिक ठसा उमटवला आहे. यावेळी पाटण तालुक्याचे माजी मंत्री विक्रमसिह पाटणकर यांच्या अमृतमहोत्सवी वाढदिवसानिमित्त अशोक सर्वांगिन विकास सोसायटीचे संस्थापक डॉ. अशोक शिलवंत तसेच उत्सव सोहळा समितीच्या वतीने भव्य नागरी सत्कार करण्यात आला.
24 डिसेंम्बर रोजी ठोमसे गावातुन बुद्धमुर्तिची ढोल ताशाच्या गजरात भव्य मिरवणूक काढण्यात आली त्यानंतर व बुद्धाच्या अस्थीची स्थापना करण्यात आली आज सकाळी भंते गन बौद्ध भिक्षुकांच्या हस्ते पॅगोडामध्ये धार्मिक विधी पार पडली.
या कार्यक्रमासाठी पाटण तालुक्यातुन मोठ्या संख्येने बौध्द बांधव उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी ठोमसे ग्रामपंचायत विकास सेवा सोसायटी ग्रामस्थ यांच्या वतिने चोख व्यवस्था करण्यात आली होती.
यावेळी खा. शरदचंद्र पवार यांचा अशोक रत्न पुरस्कार देवून सन्मान करण्यात आला. तर डॉ. गगन मलीक यांचा अशोक विभुषण, प्रवीण शिंदे यांना अशोक भुषण तर रामदास महाडीक यांना अशोकमित्र पुरस्काराने सन्मान करण्यात आला. यावेळी कमलआई पुरस्काने समाजातील माता पित्यांचा सत्कार करण्यात आला.कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. अशोक शिलवंत, सक्षम नगरसेविका सुलक्षणा शिलवंत, यांनी केले तर आभार दयानंद शिलवंत यानी केले.
शरद पवार यांच्याकडून डॉ. अशोक शिलवंत यांचे कौतुक
RELATED ARTICLES