Monday, June 23, 2025
Homeठळक घडामोडीलाभार्थी बोलणार थेट मुख्यमंत्र्यांशी..! बुधवारी लोकसंवाद ,मोबाईल, लॅपटॉप आणि संगणकावर पाहता येणार

लाभार्थी बोलणार थेट मुख्यमंत्र्यांशी..! बुधवारी लोकसंवाद ,मोबाईल, लॅपटॉप आणि संगणकावर पाहता येणार

सातारा : शासनाच्या विविध योजना गरजूंपर्यंत पोहचल्यानंतर त्यातून होणारा लाभ, त्यात येणार्‍या अडचणी आणि आवश्यक सुधारणा याची माहिती स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस लोक संवाद साधून जाणून घेणार आहेत. बुधवार दि. 2 जानेवारी 2019 रोजी सकाळी 11 वाजता लाभार्थी आणि मुख्यमंत्री यांच्यात व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे होणारा थेट लाईव्ह संवाद मोबाईल, संगणक, टॅब आणि लॅपटॉपवरही पाहता येणार आहे. हा थेट लाईव्ह संवाद मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वर्शींशपवीर.षरवपर्रींळी या फेसबुक पेजवर, ऊर्शीं ऋरवपर्रींळी या ट्विटर हॅण्डलवर आणि ऊर्शींशपवीर.ऋरवरपर्रींळी या यु ट्यूब चॅनलच्या माध्यमातून तसेच माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या षरलशलेेज्ञ.लेा/चरहरऊॠखझठ या फेसबुक पेज आणि र्र्ूेीींीलश.लेा/ारहरीरीहींीरवसळिी यु ट्यूब चॅनलवर पाहता येणार आहे.
केंद्र आणि राज्य शासनाच्या विविध योजनांची राज्यात यशस्वीपणे अंमलबजावणी सुरु आहे. प्रधानमंत्री आवास योजना (नागरी व ग्रामीण),उन्नत शेती-समृद्ध शेतकरी योजना, छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना, प्रधानमंत्री पीक विमा योजना, मागेल त्याला शेततळे,गाळमुक्त धरण,गाळयुक्त शिवार, स्व. गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजना, सूक्ष्म सिंचन आणि मृदा परीक्षण सारख्या या योजना अधिक गतीने लाभार्थ्यांपर्यंत पोहोचण्यासाठी राज्य शासनाचे प्रयत्न सुरु आहेत. गेल्या काही दिवसांपासून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विविध जिल्ह्यांमध्ये आणि मंत्रालयातही या योजनांचा आढावा घेतला आहे.

Chandrasen Jadhav
Chandrasen Jadhavhttp://GramodhharNews.com
Continuing family legacy of Dainik Gramodhhar Chandrasen Jadhav has been associated with it since last 6 years. He is the Chief Editor & looks after Online News Edition of GramodhharNews.com operated from Satara.
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular