Friday, June 20, 2025
Homeठळक घडामोडीबरड गोळीबार प्रकरणी निपक्षपातीपणे चौकशी करण्याची मागणी

बरड गोळीबार प्रकरणी निपक्षपातीपणे चौकशी करण्याची मागणी

फलटण: बरड गोळीबार प्रकरणात विजय गावडे व त्यांचे कुटुंबिय यांचेवर केलेले आरोप खोटे असून त्याची निपक्षपातीपणे चौकशी करावी अशी मागणी निवेदनाद्वारे गुणवरे ग्रामस्थांनी जिल्हाधिकारी व जिल्हा पोलिस प्रमुख यांना केली आहे.
गुणवरे ग्रामस्थांच्या वतीने जिल्हाधिकारी व जिल्हा पोलिस प्रमुख यांना दिलेल्या निवेदनात असे म्हटले आहे की, बरड येथे झालेल्या गोळीबारात विजय सदाशिव गावडे यांचा काहीही संबंध नसताना त्यांना चौकशीकामी ताब्यात घेतले आहे.
परंतु गुलाब भंडलकर उर्फ गोट्या याने मे 2017 मध्ये भैरवनाथ यात्रेच्या कालावधीत कोणत्याही कारणाशिवाय भंडलकर व 8 ते 10 लोकांनी पोलीस निरीक्षक दयानंद सदाशिव गावडे यांचेवर जिवघेणा हल्ला केला होता. त्याबाबतचा फलटण ग्रामीण पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल केला होता. त्याचे मागचे कारण पाहीले असता गेल्या 8 ते 10 वर्षामध्ये गुलाब भंडलकर उर्फ गोट्या करीत असलेल्या अवैध व बेकायदेशीर धंद्यामध्ये पोलिस निरीक्षक दयानंद गावडे यांचा अडथळा ठरतो आहे असा गैरसमज करुन घेवुन हल्ला केला होता. भंडलकर याचंवर गुन्हा दाखल होवुनही गावात तो करीत असलेली दादागिरी थांबलेली नाही. याशिवाय तो बरेच वर्षांपासून करीत असलेल्या अडचणीतील जमीनीचा बेकायदेशीरपणे ताबा घेणे, त्यासंबंधीत शेतकर्‍यांना वेठीस धरणे व पैशांची लुबाडणुक करणे हे त्याचे धंदे आजही चालु आहेत. गुन्हा दाखल झाल्यानंतरही ब – याच ठिकाणी त्याने दादागिरी करुन मारामारी केल्याचे माहित पडले आहे. तसेच शभंडलकर हा गुन्हेगारी प्रवृत्तीचा असुन त्याचे फलटण तालुक्यातील फलटण शहर, पिपरद, निंबळक, बरड, गुणवरे व इतर गावामध्ये त्याचे हस्तकामार्फत बेकायदेशीर सावकारी करीत आहे.
सदरच्या सावकारीत संबंधित शेतकर्‍यांची शेतजमीन स्वतःचे नावावर करुन घेवन संबंधितांकडून अवाचे सव्वा रक्कम घेवुन तदनंतर खरेदीखत संबंधितांच्या नावावर अथवा त्यांचे नातेवाईकाच्या नावावर पलटुन दिलेली कित्येक उदाहरणे आहेत.
गुलाब भंडलकर उर्फ गोट्या याचेवर झालेल्या गोळीबाराबाबत विजय गावडे व त्यांचे कुटुंबिय यांचा कोणत्याही प्रकारचा काडीमात्र संबंध नाही. केवळ विजय गावडे त्यांचे कुटूंबीय यांना बदनाम करणेच्या उद्देशाने खोटा आरोप करीत आहे.
भंडलकर हा गुन्हेगारी प्रवृत्तीचा असलेमुळे त्याचे अनेक बेकायदेशीर धंदे आहेत त्यामुळे त्याचेवरती अनेक गुन्हे दाखल आहेत. तरी अशा गुन्हेगारी वृत्तीच्या मानसास पाठीशी घालु नये. तसेच संबंधित भंडलकर याने विजय गावडे व त्यांचे कुटुंबिय यांचेवर केलेले आरोप खोटे असून त्याची निपक्षपातीपणे चौकशी करावी.
चौकशीअंती जे कोणी दोषी आढळतील त्यांचेवर तात्काळ कायदेशीर कारवाई करावी परंतु सखोल चौकशी न करता विजय गावडे यांना अटक करणे म्हणजे सदर कुटुंबावर नाहक अन्याय केल्यासारखे होणार आहे तरी सदर प्रकरणाची सखोल चौकशी करुन योग्य ती न्याय देण्यात यावा अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे.

Chandrasen Jadhav
Chandrasen Jadhavhttp://GramodhharNews.com
Continuing family legacy of Dainik Gramodhhar Chandrasen Jadhav has been associated with it since last 6 years. He is the Chief Editor & looks after Online News Edition of GramodhharNews.com operated from Satara.
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular