Monday, June 23, 2025
Homeठळक घडामोडीसर्वांसाठी शिक्षणातून शोध व संशोधन करणे महत्वाचेः खा.श्री.छ.उदयनराजे, 44 वे जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शन...

सर्वांसाठी शिक्षणातून शोध व संशोधन करणे महत्वाचेः खा.श्री.छ.उदयनराजे, 44 वे जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शन सातार्‍यात सुरू

साताराः आज प्रत्येकाला स्वतःची पर्सनॅलिटी डेव्हलप करण्यासाठी शिक्षण महत्वाचे आहे. आपल्या विशाल भारतात आज अनेकजण शिक्षणापासून आजही वंचित आहेत. शिक्षण घेताना तुम्ही खूप नशिबवान आहात कारण या शिक्षणातून शोध व संशोधन होणे महत्वाचे आहे तरच आईनस्टाईन, न्यूटन यासारखे चेहरे आपल्या देशातूनही निर्माण होतील असे उदगार खा.श्री.छ. उदयनराजे भोसले यांनी काढले.
महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद पुणे, राजयविज्ञान शिक्षण संस्था नागपूर, सातारा जि.प. शिक्षण विभाग व येथील डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या संयुक्त विद्यमानें सातारा येथील न्यु इंग्लिश स्कूलमध्ये डॉ.सी.व्ही.रमण शास्त्रनगरीत आयोजित केलेल्या 44 वे जिल्हास्तरीय अधिवेशनाचे उदघाटन सोहळयात खा.उदयनराजे प्रमुख पाहुणे म्हणून मार्गदर्शन करताना बोलत होते.
या उदघाटन सोहळयास जिल्हा परिषदेचे अध्यक्ष संजीवराजे नाईक निंबाळकर, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. कैलास शिंदे, प्रसिध्द जलतज्ञ डॉ.अविनाश पोळ, शालेय समितीचे अध्यक्ष अमित कुलकर्णी हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
मान्यवरांच्या हस्ते शाळेच्या संस्थापकाच्या प्रतिमेस पुष्पांजली वाहून अभिवादन करण्यात आले त्यानंतर या विज्ञान प्रदर्शनाचे उदघाटन अनोख्या पध्दतीने तुळशीच्या झाडाला पाणी घालून तर व्यासपीठावर असलेल्या अलकारीने लिहिलेल्या अक्षरांना आम्लारी स्पे्रने उजवळवत आणि आकाशात फुगे सोडून करण्यात आले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक माध्यमिक शिक्षणाधिकारी राजेश क्षीरसागर यांनी करताना दरवर्षी जिल्हास्तरावर हे वैज्ञानिक प्रदर्शन घेण्यामागे नव्या पिढीत वैज्ञानिक दृष्टीकोन वाढीस लागावा. शालेय स्तरावर बालवैज्ञानिकांचा शोध घ्यावा या माध्यमातून आयोजित करण्यात येते. आज या प्रदर्शनात 11 तालुक्यातून प्राथमिक स्तर, माध्यमिक स्तर आणि शिक्षक व परिचर यंाचे एकूण 121 उपकरणे 16 वर्गात मांडण्यात आले आहेत. यातून नव्या पिढीने साकारलेल्या संकल्पना व शोधांची सर्व जिल्हावासियांनी प्रदर्शनास भेट देवून आवश्य पाहणी करावी.
यावेळी शालेय समितीचे अध्यक्ष अमित कुलकर्णी व परिचय शिक्षक संघटनेचे अध्यक्ष भरत जगताप यंानी आपले मनोगत व्यक्त केले.
उपस्थित शालेय विद्यार्थ्याना मार्गदर्शन करताना खा.उदयनराजे भोसले म्हणाले की, दुरदृष्टी ठेवून जिद्दीने अभ्यास करा. व्हिडीओ गेम्सला दूर ठेवून मैदानी खेळ खेळा. कारण आपण मोठे होताना ध्येयाची उंची गाठण्याचा प्रयत्न करूया. शक्ती व युक्तीची सांगड घातली तरच उच्चांक गाठू शकतो. 38 हजार किमी अंतरावर असलेल्या चंद्रावर आज माणूस जात आहे. तुम्ही चांगले शिक्षण घेवून भरारी मारा. कारण वेळ ही परत येणार नाही. खर्‍या अर्थाने टाईम इन मनी हे लक्षात घ्या. शुन्यातून विश्‍वनिर्मिती करताना आकाशाएवढे मोठे व्हा. अशा शुभेच्छा मी तुम्हाला देतो.
जि.प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. कैलास शिंदे यांनी आपल्या मनोगतात पुढे चालताना आपल्या पुढे असणार्‍या आव्हानांचा वेध घ्या. आज जगात शेती, पर्यावरण, आरोग्य, दळणवळण ही आव्हाने उभी आहेत. नवकल्पनांचा विचार देत संशोधन केल्यास जीवनात मोठे बदल होतील. शिक्षकांनीही विद्यार्थ्याच्या सुप्त गुणांना वाव देण्यासाठी हे उपक्रम मोलाचे आहेत.
जि.प.अध्यक्ष संजीवराजे नाईक निंबाळकर यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात अशा वैज्ञानिक प्रदर्शनासाठी आपण तातडीने पुढील वार्षिक सभेत तीन लाखाचे निधी वाढवून सात लाख करण्यासाठी निर्णय घेवू असे सांगून न्यू इंग्लिश स्कूलला लाभलेली महान विभूतीची पार्श्‍वभूमी लक्षात घेता आज जिल्हयात सर्वात प्रथम असलेले प्रतापसिंह हायस्कूल, न्यू इंग्लिश स्कूल व रयत शिक्षण संस्थेने शिक्षणासाठी दिलेले योगदान मोलाचे आहे. आपल्या सुलभ जीवनशैलीत अनेक शोध लागतात. मात्र पर्यावरणाचा र्‍हास होतो आहे. बदलत्या जीवनशैलीत पर्यावरण वाचवण्यासाठी संशोधनाचे आव्हान नवीन पिढीने स्वीकारावे.
कार्यक्रमाचे सुत्रसंचालन जगदीश पवार यांनी केले. तर आभार प्रदर्शन आण्णासाहेब मगदूम यांनी केले.
कार्यक्रमास महिला व बालविकास समिती सभापती सौ. वनिता गोरे,जिप सदस्या सौ.भाग्यश्री मोहिते, शालाप्रमुख सौ.स्नेहल कुलकर्णी, उपशालाप्रमुख डी.एस.कांबळेयांचेसह सातारा जिल्हयातील विविध शाळांचे मान्यवर, शिक्षक, शिक्षिका उपस्थित होते.
उदघाटन सेाहळयापूर्वी न्यू इंग्लिश स्कूलच्या विद्यार्थी विद्यार्थीनीनी शहरातून ढोल ताशांच्या गजरात भव्य विज्ञान दिंडी काढली. या विज्ञान दिंडीचे पुजन उपशिक्षणाधिकारी रमेश चव्हाण, शिक्षण विस्तार अधिकारी मंगल मोरे यांचे हस्ते करण्यात आले. विज्ञान दिंडीत ठेवलेल्या पालखीतील निवडूंगाचे झाड, परीक्षानळी, सेल, चंचुपात्र आदी उपकरणे लक्षवेधक ठरत आहे.
प्रेक्षागृहापुढे विज्ञान प्रदर्शनात देश परदेशातील 28 ज्येष्ठ वैज्ञानिक संशोधकांची छायाचित्रे व त्यांची माहिती प्रदर्शीत करण्यात आली आहे तसेच शाळेच्या आवारात सेव्ह नेचर सेव्ह फयुचर या संकल्पनेतून साकारलेली भव्य कलात्मक रांगोळी या प्रदर्शनाचे आकर्षण ठरत आहे. उदया दि.9 व परवा गुरूवार दि.10 रोजी हे प्रदर्शन सर्वाना पाहण्यासाठी खुले असून नवीन संशोधक मनाने निर्माण केलेली उपकरणे समस्त जिल्हावासियांनी आवर्जुन पहावीत असे आवाहन संयोजिका शालाप्रमुख सौ.स्नेहल कुलकर्णी यांनी केले आहे.

Chandrasen Jadhav
Chandrasen Jadhavhttp://GramodhharNews.com
Continuing family legacy of Dainik Gramodhhar Chandrasen Jadhav has been associated with it since last 6 years. He is the Chief Editor & looks after Online News Edition of GramodhharNews.com operated from Satara.
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular