पाटण : घराची वाट बघता-बघता पत्र्याच्या शेडात राहण्याची वेळ कवडेवाडी ता. पाटण येथील श्रीमती सुंदराबाई ज्ञानू सांळुखे या आजीवर आली आहे. ती सद्या आपल्या कुटूंबाला घेऊन या कडाक्याच्या थंडीत फाटक्या पत्र्याच्या शेडात रहात असल्याचे भयावय चित्र येथे दिसत आहे. पंतप्रधान घरकुल अवास योजनेतून गेल्या दोन वर्षा पूर्वीच या आजीचे घरकुल लाभार्थी म्हणून पात्र यादीत नाव आले आहे. केवळ पाटण पंचायत समितीतील संबधित क्लार्क आणि कवडेवाडीचे सरपंच, ग्रामसेवक यांच्या दुर्लक्षित कारभारामुळे या आजीचा संसार उघड्यावर आला असल्याचे चित्र येथे दिसत आहे. पंचायत समिती व संबधित ग्रामपंचायतीच्या भोंगळ कारभारामुळे या आजीला आयुष्याच्या शेवटच्या टप्प्यात हक्काचे घर मिळणार का? असा प्रश्न उपस्थित झाला आहे.
श्रीमती सुंदराबाई ज्ञानू सांळुखे रा. कवडेवाडी ता. पाटण असे या थकलेल्या आजीच नाव असुन तिने थेट गटविकास अधिकारी पंचायत समिती पाटण यांनाच दि. 7/12/2018 रोजी निवेदन देवून आपली हकीकत सांगितली आहे. तरी देखिल गटविकास अधिकारी यांचे या आजीच्या घर मागणीच्या निवेदनाकडे लक्ष जाऊ नये ही दुर्दव्य ठरले आहे.
या आजीने गटविकास अधिकारी पंचायत समिती पाटण यांना दिलेल्या निवेदनात म्हणले आहे. प्रधानमंत्री घरकुल आवास योजनेच्या सन- 2016- 17 च्या यादीत माझे नाव पात्र झालेले आहे. परंतू 2018 च्या औनलाईन सर्व्हेत वारवांर सरपंच, ग्रामसेवक यांना भेटून देखिल घराचा सर्व्हे केला नाही. यामुळे मी घर मिळण्यापासुन वंचित राहिले आहे. गेल्या दोन वर्षापासुन मी माझ्या कुटूंबाला घेऊन दुसर्याच्या वळचणीला पत्र्याच्या शेडात राहत आहे. माझे कुटूंब बेघर झाले असुन संसार रस्त्यावर आला आहे. असे निवेदनात म्हणले आहे.
या आजीच्या कुटूंबात मुलगा, सुन, नांतवंडे असा परिवार आहे. मुलगा मिळेल तिथे मोल-मजुरी करुन आपल्या कुटूंबाचा उधरनिर्वाह करत आहे. दोन नातवंडानी अर्थिक परस्थितीनुसार शाळा सोडून मुंबई येथे हौटेलमधे काम धरले आहे. अशा परस्थितीत अयुष्याच्या शेवटच्या टप्प्यात या आजीला स्वतःचे घर मिळणार का ? असा प्रश्न निर्माण झाला आहे.
आयुष्याच्या शेवटच्या टप्प्यात आजीला घर मिळणार का?
RELATED ARTICLES