Saturday, April 20, 2024
Homeक्रीडागुरुकुल स्कुलच्या विद्यार्थिनींना खेलो इंडिया स्पर्धेत 3 सुवर्ण पदके

गुरुकुल स्कुलच्या विद्यार्थिनींना खेलो इंडिया स्पर्धेत 3 सुवर्ण पदके

सातारा : पुणे बालेवाडी येथे सुरु असलेल्या राष्ट्रीय पातळीवर आयोजित करण्यात आलेल्या खेलो इंडिया खेलो युथ गेम्स स्पर्धेत गुरुकुल स्कूल सातारच्या दोन विद्यार्थिनींना सुवर्णपदकांची अक्षरश: लुट केली. खेलो इंडिया स्पर्धेत 3 सुवर्ण पदक मिळविणारी गुरुकुल ही एकमेव शाळा आहे.
अत्यंत चुरशीच्या झालेल्या अंतिम सामन्यात 17 वयोगटात 100 मीटर धावणे या प्रकारात तसेच 100ु4 रिले या प्रकारात गुरुकुल स्कूलच्या सुदेष्णा हणमंत शिवणकर हिने सुवर्णपदक मिळविले. तसेच 17 वयोगटात बॅटमिंटन (डबल) प्रकारात आर्या राहुल देशपांडे हिने सुवर्णपदक मिळविले.
गुरुकुल स्कुलच्या या दोन्हीही विद्यार्थिनींनी सातारा जिल्हयाच्या व महाराष्ट्राच्या खेळाच्या क्षेत्रात इतिहासात रचला असून सर्व सातारवासियांना अभिमान वाटेल अशी कामगिरी करत मानाचा तुरा रोवला आहे.
गुरुकुल एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष राजेंद्र चोरगे यांनी कु. सुदेष्णा हणमंत शिवणकर व कु. आर्या राहुल देशपांडे या दोघींचा सत्कार केला. यावेळी संस्थेचे सचिव आनंद गुरव, मुख्याध्यापिका सौ.शिला वेल्हाळ,जनसंपर्क अधिकारी विश्‍वनाथ फरांदे, माध्यमिक विभाग प्रमुख सोनाली तांबोळी, प्राथमिक विभाग प्रमुख अनुराधा कदम उपस्थित होते.
या दोन्हीही मुलींनी अत्यंत जिद्दीने वाटचाल करत यश मिळवले असून गुरुकुल परिवारास त्याचा अभिमान आहे असे गौरवोद्गार राजेंद्र चोरगे यांनी काढून पुढील वाटचालीस सर्वतोपरी सहकार्य गुरुकुलच्या माध्यमातून करण्यात येईल असे मनोगत व्यक्त केले. त्याचप्रमाणे लवकरच सत्कार समारंभ रॅली आयोजित करण्यात येणार आहे. अ‍ॅड. राजेंद्र बहुलेकर, मधुकर जाधव, संजय कदम, उदय गुजर, नितीन माने, दिपक मेथा, सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

Chandrasen Jadhav
Chandrasen Jadhavhttp://GramodhharNews.com
Continuing family legacy of Dainik Gramodhhar Chandrasen Jadhav has been associated with it since last 6 years. He is the Chief Editor & looks after Online News Edition of GramodhharNews.com operated from Satara.
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular