कराड : सुप्रसिध्द गायिका सावनी शेंडे व प्रख्यात सरोद वादक पं. निभंजन भट्टाचार्य या नामवंताच्या सहभागाने दि. 28 व 29 जानेवारी 2019 रोजी प्रीतिसंगम संगीत महोत्सव संपन्न होत आहे.
भारतीय शास्त्रीय गुणिताला फार मोठी परंपरा आहे. या कलेला जगभरात अत्यंत मानाचे स्थान आहे. अभिजात शास्त्रीय संगीत हे आपल्या जीवनाचे अविभाज्य अंग आहे. कराड व परिसरातील ग्रामीण भागात या कलेचे उपासक खूप मोठ्या प्रमाणात आहेत.
त्यांना या क्षेत्रातील दिग्गज व नामवंताची कला पहायला व अनुभवायला मिळाली तर त्यांच्या संगीत साधनेला योग्य दिशा मिळेल. या हेतूने आमची संस्था गेली 19 वर्षे सातत्याने प्रीतिसंगम संगीत महोत्सवाचे आयोजन करत असते. या क्षेत्रातील नामवंत कलाकारांचे मानधन व आयोजनातील प्रचंड खर्च. तसेच आपल्या परिसरातील आर्थिक मर्यादा अशा परिस्थीतीमध्ये शास्त्रीय संगीतातील दिग्गजांची कला इथल्या नवोदितांना व जाणत्या ररिकांना अनुभवायला मिळत नव्हती. कोणीतरी यात पुढाकार घेणे आवश्यक होते. आमच्या संस्थेने 19 वर्षांपूर्वी उस्ताद अमीर हुसेन खाँ साहेबांच्या जन्म शताब्दीच्या निमित्ताने ही कोंडी फोडली. व प्रतिसंगम संगीत महत्त्वाचे आयोजन करण्यास सुरुवात केली. अभिजात शास्त्रीय संगीत या परिसरात रूजावे, वाढावे व त्याचा फायदा नवोदितांना तसेच जाणत्या रक्षिकांना व्हावा केवळ याच उद्देशाने हा उपक्रम आमची संस्था आर्थिक नुकसानीचा विचार न करता सातत्याने घेत आहे.
आजपर्यंतच्या महोत्सवात ख्यातनाम गायिका आशा भोसले, पं. जयराज, पं. किशोरी आमोणकर, पं हरीप्रसाद चौरसिया, पं. एन. रानमं, पं. अजय पोहनकर , पं. अरविंद मुळगावकर, पं. विश्वमोहन भट्ट, पं. राजन व साजन मिश्रा, संगीतकार नौशाद, पं, मालीनी राजूरकर, देवकी पंडीत, आरती अंकलीकर-टिकेकर, शर्वरी जमेनीस, पं. तरूण भट्टाचार्य, पं. प्रभाकर कारेकर, पं, व्यंकटेशकुमार, पं. जयतिर्थ मेउंडी, पं. हिमांशू नंदा, पं. रोणु मुजुमदार, आशा देशातल्या अत्यंत प्रतिभा संपन्न दिग्गज कलाकारांच्या उपस्थितीमुळे प्रीतिसंगम संगीत महोत्सवाला राष्ट्रीय पातळीवर प्रतिष्ठा प्राप्त झाली आहे.
या वर्षांचा संगीत महोत्सव दि. 28 व 29 जानेवारी 2019 या कालावधीत दररोज यात्री 8:30 ते 11:30 या वेळेत सौ. वेणुताई चव्हाण सांस्कृतीक सभागृह कराड येथे संपन्न होणार आहे. या महोत्सवाची सुरूवात सुप्रसिध्द गायिका सावनी शेंडे, यांच्या गायनाने होणार आहे. ठुमरी व दादरा या वैशिष्ठपूर्ण गायिकेचा लाभ रसिकांना मिळणार आहे. त्यांना श्री हणमंत फडतरे- तबला व श्री. उदय कुलकर्णी -संवादीनी यांची साथ संगत लाभणार आहे. दि. 29 रोजी ख्यातनाम सरोद वादक पं. निभंजन भट्टाचार्य, कलकत्ता यांचे सरोद वादन होणार आहे. त्यांना तबल्यावर श्री हणमंत फडतरे यांची साथसंगत लाभणार आहे. अशा दर्जेदार कार्यक्रमांचे आयोजन कराड व परिसरातील रसिकांसाठी विनामूल्य करण्यात आले आहे.
प्रीतिसंगम संगीत महोत्सव हा कराडच्या सांस्कृतिक परंपरेतील एक मानबिंदु आहे. या महोत्सवात कराड व परिसरातील रसिकांनी उत्फूर्त प्रतिसाद देवून या नामवंत कलाकारांच्या कलाविष्काराचा रसिकांनी अस्वाद घ्यावा, असे आवाहन जनरल सेक्रेटरी सुधीर एकांडे यांनी केले.
रसिक कराडकरांना प्रीतिसंगम संगीत महोत्सवाची पर्वणी
RELATED ARTICLES

