भणंग ते केळघरपर्यंतचे खड्डे भरण्याचे बांधकामाला आदेश: नूतन सभापती जयश्री गिरींना देणार ताकद

केळघर: जावळी पंचायत समिती सभापती खांदेपालट होऊन नूतन सभापती जयश्री गिरी यांनी प्रत्यक्षात सोमवारपासून कामकाजास सुरुवात केली.दरम्यान सोमवारी कामकाजाच्या पहिल्या दिवशी आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी पंचायत समितीस भेट देऊन कामकाजाचा आढावा घेत नूतन सभापती जयश्री गिरी यांना कामकाज करताना ताकद देणार असल्याचे स्पष्ट करीत विविध खात्यांचा आढावा घेतला.
यावेळी आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी जयश्री गिरी यांचा सत्कार केला.
आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी पंचायत समितीस भेट देऊन विविध खात्यांचा आढावा घेतला.यावेळी बांधकाम उपअभियंता कृष्णात निकम यांना भणंग ते केळघर पर्यंत रस्त्याला खड्डे पडलेत ते खड्डे तात्काळ भरा.आणि ते भरत असताना केळघर पासून हे खड्डे भरण्यास सुरुवात करण्याच्या सूचना देखील आमदारांनी यावेळी बांधकाम अधिकार्‍यांना केल्या.तसेच इतर खात्यांचा देखील आढावा घेतला.
यावेळी जयश्री गिरी यांना पंचायत समिती आदर्श कामकाजासाठी आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी शुभेच्छा दिल्या.तर सभापती जयश्री गिरी म्हणाल्या पंचायत समितीचे कामकाज करताना सर्वांना विश्वासात घेऊन आपण कामकाज करणार असून पक्षाच्या नेत्यांनी दाखवलेला आपल्यावरील विश्वास आपण सार्थ करून दाखवणार असल्याची ग्वाही गिरी यांनी यावेळी देत डोंगरमाथ्यानवरील गावांमधील नागरिकांचे प्रश्न सोडवण्यावर आपला भर असेल असे मत देखील जयश्री गिरी यांनी यावेळी व्यक्त केले.
यावेळी माजी सभापती सुहास गिरी , पंचायत समिती सदस्य विजय सुतार,सेवा दल अध्यक्ष नामदेव धनावडे, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष राजेंद्र सकपाळ , मोहनराव कासुर्डे, संतोष शेलार,सयाजी कदम,सुनिल फरांदे,आनंदराव जुनघरे सेवादल सदस्य अजित जाधव,गटविकास अधिकारी सतीश बुद्धे.,कार्यकर्ते मोठया संख्येने उपस्थित होते.