Tuesday, June 24, 2025
Homeठळक घडामोडीमकर संक्रांतीनिमित्त शानभाग विद्यालयात रंगल्या मेहंदी व पतंग उडवण्याच्या स्पर्धा

मकर संक्रांतीनिमित्त शानभाग विद्यालयात रंगल्या मेहंदी व पतंग उडवण्याच्या स्पर्धा

सातारा : येथील शामसुंदरी रिलीजीअस अँड चॅरिटेबल ट्रस्टच्या के.एस.डी. शानभाग विद्यालय व ज्युनिअर कॉलेजमध्ये मकर संक्रांतीचे औचित्य साधुन मेहंदी व पतंग उडवण्याच्या स्पर्धा मोठ्या उत्साहात संपन्न झाल्या. या स्पर्धेसाठी शाळेतील व महाविद्यालयातील इयत्ता 5 वी ते 11 वीच्या मुलींनी सहभाग घेतला.
आपल्या पारंपारीक सण व संस्कृतिची जोपासणा व्हावी कलेचे प्रकार नव्या पिढीकडून वूध्दीगत व्हावे यासाठी हा उपक्रम घेण्यात आल्याची माहिती शाळेच्या संचालीका सौ. आचल घोरपडे यांनी दिली.
विद्यालयाच्या मैदानावर शालेय विद्यार्थ्यांनी मोठ्या उत्साहाने पतंग उडवण्याच्या स्पर्धेत सहभाग घेतला. यावेळी विविध रंगाचे, विविध आकारातील आकाशात उंच झेपावणारे पतंग पाहताना लहानांपासून मोठ्यांनाही कुतुहल वाटत होते.
शाळेच्या भव्य प्रांगणात एकमेकिंच्या हातावर मेंहदीचे विविध कलात्मक डिझाईन, पाना फूलांची नक्शी, आध्याक्षर, रेखाटताना मुली दंग झाल्या होत्या.
इंग्रजी माध्यमाची शाळा असूनही आपल्या महाराष्ट्र राज्याची सण व संस्कृतिंची परपरा येथे अभ्यासाबरोबरच विशेष करुन जपली जाते. अभ्यासाबरोबरच खेळाचे महत्व जीवनात तितकेच मोलाचे असल्याने शाळेच्या गेली अनेक वर्षे लागत असलेल्या शंभर टक्के निकालासोबतच मागील अनेक वर्षात शाळेच्या मुलामुलींनी क्रीडा प्रकारात आंतरराष्ट्रीय तसेच राष्ट्रीय स्तरावर, राज्य पातळीवर पारितोषीके मिळवली आहेत.
या मेंहदी व पतंग स्पर्धेच्या संयोजनासाठी विद्यालयाचे संस्थापक रमेश शानभाग, संचालीका सौ. आचल घोरपडे, मुख्याध्यापिका सौ. रेखा गायकवाड, मुख्याध्यापक भाग्यश कुलकर्णी व शाळेच्या शिक्षक, शिक्षीकांचे मार्गदर्शन लाभले.

Chandrasen Jadhav
Chandrasen Jadhavhttp://GramodhharNews.com
Continuing family legacy of Dainik Gramodhhar Chandrasen Jadhav has been associated with it since last 6 years. He is the Chief Editor & looks after Online News Edition of GramodhharNews.com operated from Satara.
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular