Friday, June 20, 2025
HomeUncategorizedजवळवाडी ग्रामपंचायतीच्या वतीने "अर्सेनिक अल्बम ३०" गोळ्यांचे मोफत वाटप ; या...

जवळवाडी ग्रामपंचायतीच्या वतीने “अर्सेनिक अल्बम ३०” गोळ्यांचे मोफत वाटप ; या कार्यात युवकांचे योगदान महत्वाचे

मेढा ( वार्ताहर ) :- कोरोना या संसर्गजन्य रोगाने संपूर्ण जगात थैमान घातले असून सातारा जिल्ह्यासह जावळी तालुक्यातही कोरोना बाधितांची संख्या वाढत आहे. अशा परिस्थितीत जवळवाडी ग्रामपंचायतीच्या वतीने ग्रामस्थांची रोग प्रतिकार शक्ती वाढावी यासाठी अर्सेनिक अल्बम ३० या गोळ्यांचे ग्रामस्थांचे घरात जावून वाटप करण्यात आले या बद्दल ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले आहे.
जवळवाडी गावातील युवक एकजुटीने कोरोना संसर्गजन्य रोगावर मात करण्यासाठी सातत्याने प्रयत्नशिल असून विविध उपक्रम राबवित आहेत. गेल्या दोन महिन्याच्या कालावधित गरिब व गरजु लोकांना तीन वेळा ग्रामस्थांनी मदतीचा हात दिला. युवकांनी एकत्र येत विहीर, पाण्याची टाकी,शाळा, मंदिर स्वच्छता मोहीम,रक्तदान शिबीर, असे विविध उपक्रम राबविण्यात आले.ग्रामपंचायतीच्या वतीने जंतूनाशकांची फवारणी करण्यात आली. परजिल्ह्यातून आलेले ग्रामस्थही १४ दिवसांचा होमक्वारंटाइनचा कालावधी घरात रहावून तंतोतंत पाळत असून गरजू ग्रामस्थांना पिण्याचे पाणी व जीवनावश्यक वस्तुंचा पुरवठा करण्यात युवकांनी पुढाकार घेतला आहे. नुकताच घराघरात जावून युवकांनी सर्वे करून प्रत्येक ग्रामस्थाची माहिती अपडेट केली आहे.
आयुष मंत्रालयाने जाहीर केल्याप्रमाणे
अर्सेनिक अल्बम ३० या होमिओपॅथीच्या गोळ्या रोग प्रतिकार शक्ती वाढविण्यासाठी उपयोगी ठरत असल्यामुळे ग्रामपंचायतीच्या वतीने या गोळ्यांचे वाटप घराघरात जावून करण्यात आले. या उपक्रमातही अनेक युवकांनी सहभागी होत अवघ्या चार तासात गोळ्यांचे वाटप करून युवकांनी आपल्या कार्याची चुणुक दाखविली आहे. युवकांच्या सहभागामुळेच आम्ही अभिनव उपक्रम राबविण्यात यशस्वी ठरत असल्याचे सरपंच सौ वर्षा जवळ यांनी सांगितले. यावेळीउपसरपंच श्री शंकरराव जवळ व मंडळाचे अध्यक्ष श्री सदाशिव जवळ व जेष्ठ ग्रामस्थांनी युवकांच्या या अभिनव कार्याचे कौतुक केले आहे.

Chandrasen Jadhav
Chandrasen Jadhavhttp://GramodhharNews.com
Continuing family legacy of Dainik Gramodhhar Chandrasen Jadhav has been associated with it since last 6 years. He is the Chief Editor & looks after Online News Edition of GramodhharNews.com operated from Satara.
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular