
सातारा : सातारा शहरात बुधवारी भाजपाचे शहराध्यक्ष सुनील काळेकर व भाजप कार्यकर्ते संदीप मेळाट (वय 28) यांच्यावर सातारा शेती उत्पन्न बाजार समितीच्या जवळ मटके व्यावसायिक यांनी दांडक्याने प्राणघातक हल्ला केला आहे. या हल्ल्यात काळेकर व मेळाट गंभीर जखमी झाले आहेत.
दरम्यान, हा वाद आर्थिक देवाणघेवाणीतून झाल्याची चर्चा सुरू आहे. भाजपा पदाधिकार्यावर हल्ला झाल्यानंतर संतप्त झालेल्या भाजपा कार्यकर्त्यांनी शेती उत्पन्न बाजार समिती जवळील मटका टपर्या उध्दस्त केल्याने तणावाचे वातावरण पसरले होते.
याबाबत समजलेली सविस्तर माहिती अशी की, सातारा शहर व परिसरात मोठ्या प्रमाणात मटका व्यवसाय बंद करावेत म्हणून भाजपाच्या पदाधिकार्यांनी वारंवार पोलीस प्रशासनाकडे मागणी केली होती. बुधवारी रात्री 7.45 वाजता भाजपा शहराध्यक्ष सुनील काळेकर व त्याचें साथीदार संदीप मेळाट व इतर तीन ते चार जणशेती उत्पन्न बाजार समिती जवळ गेले होते. दरम्यान, मटक्याचा व्यवसाय करणार्या 3 ते 4 जणांनी हातात दांडके घेवून काळेकर व मेळा यांच्यावर हल्ला चढविला. या हल्ल्यात दोघेजण जखमी झाल्याने त्यांना उपचारासाठी रात्री 8.30 वाजता क्रांतीसिंह नाना पाटील सर्वसाधारण जिल्हा रूग्णालयात दाखल करण्यात आले. काळेकर यांच्या एका पायावर मार लागला असून डोक्याच्या डोळ्याजवळ जबर मार लागला आहे. या काळेकर हल्ल्यात काळेकर यांचा साथीदार जखमी झाला आहे. रात्री या घटनेची माहिती कळताच भाजपाचे जिल्हाध्यक्ष विक्रम पावस्कर, दिपक पवार, नगरसेवक विजय काटवटे, जांबळे तसेच कार्यकर्त्यांनी रुग्णालयात गर्दी केली होती. हल्लेखांना अटक करावी अशी मागणीही करण्यात आली आहे. शाहुपुरी पोलीस ठाण्याचे पो.नि.बेंद्रे व त्यांच्या सहकार्यांनी घटनास्थळी धाव घेवून पहाणी केली तसेच रुग्णालयात येवून जखमींचे जबाब नोंदविण्याचे काम सुरू होते. रात्री उशिरापर्यंत मात्र, शाहुपूरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झालेला नव्हता.
भाजपा पदाधिकार्यांना संरक्षण पुरविले जाणार का?
भाजपाचे जिल्हाध्यक्ष विक्रम पावस्कर यांच्या बंधूवर कराड तालुक्यात जेवणासाठी एका हॉटेलवर गेल्यावर गोळीबार झाला होता.या घटनेतील आरोपी मोकाटच आहेत. यानंतर भाजपा शहराध्यक्ष सुनील काळेकर व संदीप मेळाट यांच्यावर मटका बुकीकडून बुधवारी हल्ला झाला आहे. यामुळे आता यापुढे पोलीस अधिक्षक संदीप पाटील भाजपा पदाधिकार्यांना संरक्षण पुरविणार का? अशी चर्चा सुरू आहे.