औंध : पुसेसावळी ते कराड रस्त्यावर अवैध्यरित्या संगणमताने वाळू वाहतूक करणार्या ट्रँक्टरवर कारवाई करून पोलीसांनी सुमारे पाच लाख सात हजार रुपयांचा ऐवज जप्त करून चार जणांवर गुन्हा दाखल केला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी, सोमवारी दुपारी पुसेसावळी ते कराड रस्त्यावर एका पेट्रोल पंपासमोर बाळासो बाजीराव माने वय 40रा.राजाचे कुर्ले, बाळू परशुराम घाडगे वय 36रा.पुसेसावळी यानी ट्रक्टर मालक कूष्णत रामचंद्र कदम रा.पुसेसावळी, संजय शिंदे रा.उंचीठाणे यांचे सांगणेवरून आपसात संगणमत करून टँक्टर क्रमांक चक11इ- 2825 चोरटी वाळू वाहतूक केल्याप्रकरणी त्यांचे विरोधात औंध पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फिर्याद किरण जाधव यांनी दिली.
सदर घटनेची नोंद औंध पोलीस स्टेशन मध्ये झाली असून सपोनि सुनील जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार प्रशांत पाटील, कुंडलिक कटरे अधिक तपास करीत आहेत.
अवैध्यरित्या वाळू वाहतूक करणार्या चार जणांवर गुन्हा दाखल करून सुमारे पाच लाखाचा ऐवज जप्त
RELATED ARTICLES