Thursday, June 19, 2025
HomeUncategorizedपरळी फाटा येथील बसस्थानकाची दुरावस्था ; बस स्थानकातच तळीरामांचा अड्डा

परळी फाटा येथील बसस्थानकाची दुरावस्था ; बस स्थानकातच तळीरामांचा अड्डा

परळी:- भोंदवडे-पाटेघर हा मुख्य रस्ता जरी असला तरी बाराजपेठेसाठी बहुतांश ग्रामस्थ हे परळी येथे येतात. परंतु पाटेघर येथून येताना लागणाऱ्या परळी फाटा बसस्थानकाची दुरवस्था झाली आहे.
पाटेघर, आलवडी, सावली तसेच अनेक गावांना परळी येथे येण्यासाठी भोंदवडे येथील मार्गापेक्षा परळी फाटा येथून सोईस्कर पडते परंतु बसस्थानकाची दुरावस्था तसेच पावसाची सुरू असलेली रिपरिप यामुळे प्रवाशांना अडचणी येत आहेत. बसस्थानकामध्ये तळीरामांनी आपला बस्तान बसल्याचे चित्र दिसते जिकडे-तिकडे दारूच्या बाटल्यांचा खच तसेच पाऊस जोरात आला तर आपली गुरेढोरे बस स्थानकातच आडोशाला उभी केल्याने बस स्थानकात त्यांची घाण आहेच. तसेच या घानी मुळे डासांचे प्रमानही असल्याने बस स्थानकाची स्वच्छता करून तळीरामांना अटकाव घालण्याची मागणी ग्रामस्थांकडून तसेच प्रवाशांकडून होत आहे.

Chandrasen Jadhav
Chandrasen Jadhavhttp://GramodhharNews.com
Continuing family legacy of Dainik Gramodhhar Chandrasen Jadhav has been associated with it since last 6 years. He is the Chief Editor & looks after Online News Edition of GramodhharNews.com operated from Satara.
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular