केळघर / प्रतिनिधी . :- संपूर्ण जगासह महाराष्ट्रभर कोरोना सारख्या महाभयंकर विषाणूने थैमान घातले असून गेल्या महिन्याभरापासून संपूर्ण महाराष्ट्रात संचारबंदीचे आदेश लागू करण्यात आले आहेत व संपूर्ण राज्य लॉक डाऊन झाले आहे .परंतु हातावर पोट असणाऱ्या व रोज काम करुन आपला उदरनिर्वाह भागवणाऱ्या बेलदार समाज बांधवांवर उपासमारीची वेळ आली असून बेलदार समाजातील बहुतांश युवक बांधकाम करून व दगड फोडून आपल्या कुंटुबाची उपजीवीका भागवत असतात परंतु या संचारबंदीमुळे सर्व कामे बंद असल्या कारणामुळे या समाजातील अनेक कुटुंबांवर उपासमारीची वेळ आली आहे तरी शासनाने याचा गंभीरपूर्वक विचार करून या समाजाला ताबडतोब आर्थिक मदत करावी अशी मागणी सातारा जिल्हा बेलदार समाज संघटनेचे युवा जिल्हाध्यक्ष नारायण जाधव यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केली आहे .
त्याबरोबर बेलदार समाजातील ज्या लोकांकडे शिधापत्रिका नाहीत व ते ज्या ठिकाणी कामाधं दयासाठी गेले आहेत त्या समाज बांधवांनाही त्या तहसिल मार्फत आदेश देवुन माहिती घेवुन त्यांना अन्नधान्य देण्यात यावे व बरेच ठिकाणी समाज बांधवांकडे शिधापत्रीका असतानाही त्यांना शासन निर्णया प्रमाणे धान्य पूरवठा होत नाही याचीही दखल घेण्यात यावी असे सुचित केले.
– समाजातील ज्या लोकांकडे बांधकाम मजुर असतानाही त्यांची शासनदरबारी नोंद नाही अशा समाजबांधवांची बांधकाम कामगार म्हणून नोंद करण्यात यावी व त्यांना शासनाकडून ताबडतोब अर्थिक मदत मिळावी .. :- बेलदार समाज युवा जिल्हाध्यक्ष नारायण जाधव

