जमिनी वाटपाचा आदेश आणि सातबारे तयार झाल्याशिवाय आंदोलन स्थळावरून उठणार नाही : डॉ .भारत पाटणकर

पाटण:- ( शंकर मोहिते)- कोयना धरण प्रकल्पग्रस्तांचे संकलन तयार आहे, जमीन तयार आहे. लाभक्षेत्र आहे मग वाटपास वेळ कशाला,? जमिनी वाटपाचा आदेश आणि सातबारे तयार झाल्याशिवाय आंदोलन स्थळावरून उठणार नाही असा इशारा डॉ .भारत पाटणकर यांनी कोयनानगरच्या विराट मेळाव्यात प्रकल्प ग्रस्तासमोर शासनाला दिला.

कोयनानगर येथील शिवाजी क्रीडांगणावर कोयना प्रकल्प ग्रस्तांच्या दुसऱ्या टप्प्यातील आणि निर्णायक आंदोलनात बोलताना डॉ भारत पाटणकर म्हणाले,मुख्यमंत्र्यानी गेल्या वर्षी कोयना प्रकल्प ग्रस्तांची विधान भवनात मिटिंग घेऊन कोयना प्रकल्प ग्रस्तांच्या १४ मागण्या मान्य केल्या या मागण्या तीन महिन्यात पूर्ण कराव्या पण तसे न होता महसूल प्रक्रिया मुंगीच्या चालीने आणि संथ गतीने काम चालू आहे.कोयना प्रकल्प ग्रस्ता ची पात्र प्रकल्प ग्रस्त यादी तयार झाली आहे, हरकती, आक्षेप घेऊन झाले.जिल्हाधिकारी कार्यालयात प्रकल्प ग्रस्तांसाठी जमीन उपलब्ध आहे असेही सांगितले जातेय,मग घोड अडतंय कुठं? आम्हाला दुसऱ्यादा आंदोलन करण्याची वेळ का यावी, ही खेदाची बाब म्हणावी लागेल,आज कोयना प्रकल्प ग्रस्तासाठी महाराष्ट्रातील अकरा जिल्ह्यात श्रमिक मुक्ती दलाशी संबंधित संघटनांचे आंदोलने चालू आहेत.कोयना प्रकल्प ग्रस्तांच्या मागण्यांची अंमलबजावणी होत नाही.तो पर्यंत उठायचे नाही असा निर्धार सर्व ठिकाणी करण्यात आला आहे, ज्या कोयना प्रकल्प ग्रस्ताना यापूर्वी अंशतः जमीन नी दिल्या त्या पिकावू नाहीत,त्या ज्यांना बदलून हव्या त्यांना बदलून देऊन त्यास पाण्याची सोय करावी,अजिबात जमिनी दिल्या नाहीत त्यांना जमिनी आणि त्या जमिनीला पाण्याची सोय करण्यात यावी.आणि त्यांना मुख्यमंत्र्याच्या बरोबर झालेल्या मिटिंगच्या तारखेपासून निर्वाह भत्ता देण्यात यावा.प्रकल्प ग्रस्तना नोकरीत सामावून घेण्यात यावे, प्रकल्प ग्रस्त गावाला मोफत वीज देण्यात यावी अशा प्रमुख मान्य झालेल्या मागण्याची अंमल बजावणी झाल्या शिवाय हे आंदोलन थांबणार नाही,असा इशाराही डॉ भारत पाटणकर यांनी दिला.पाटण तालुक्यातील प्रकल्प ग्रस्तानी या आंदोलनात कंबर कसली असून मागण्याची अंमल बजावणी होत नाही तो प्रयन्त उठणारच नाही असा विश्वास व्यक्त केला आहे. वेळप्रसंगी गुरे-ढोरे ,जनावरे घेऊन आंदोलनस्थळी येणार असल्याचे प्रकल्प ग्रस्तानी सांगितले, संपूर्णपणे चुलबंद आंदोलन करणार असण्याचे प्रकल्प ग्रस्तानकडून बोलले जात आहे.यावेळी प्रकल्प ग्रस्तानी कोयनानगर येथे स्टँड, कॉलनी,कोयना सिंचनभवन याठिकाणी मोर्च्या काढून आंदोलन स्थळी येऊन सभा घेतली,
यावेळी मालोजी पाटणकर, हरिश्चंद्र दळवी, चैतन्य दळवी, संजय लाड, महेश शेलार, सचिन कदम, श्रीपती माने, संजय कांबळे यांच्यासह हजारो प्रकल्प ग्रस्त उपस्तीत होते,