महाबळेश्वर :- महाबळेश्वर तालुक्यातील माचूतर गावानजीकच्या जंगलामध्ये कुत्र्यांच्या चाव्याने गंभीर जखमी झालेल्या नर भेकराचा उपचाराआधीच त्याचा मृत्यू झाला आठवड्यातील ही दुसरी घटना आहे.
माचूतर गावानजीक जंगल परिसरामध्ये हे भेकर फिरत होते या भेकराचा पाठलाग करून श्वानांनी त्याचा चावा घेतला होता त्यामुळे भेकराच्या अंगावर गंभीर स्वरूपाच्या जखमा झाल्या होत्या , माचूतर येथील संतोष शिंदे,सुधीर शिंदे,प्रकाश शिंदे,संजय शिंदे या तरुणांनी या जखमी भेकरास महाबळेश्वर वनविभागाच्या ताब्यात दिले मात्र या जखमी भेकराचा उपचारांआधीच मृत्यू झाला असून आठ दिवसांपूर्वी भेकावली येथे देखील एक भेकराचा मृत्यू झाल्याची घटना घडली होती.