
सातारा : सातारा पालिकेच्या सहा नगरसेवकांनी शिट्टया वाजवत नगर पालिकेच्या सभागृहात प्रवेश केला सर्व नगरसेवकांनी तोंडाला काळ्या पट्या बांधून सभागृहाचे लक्ष वेधून घेतले. सातारकरांना मूलभूत सुविधापासून वंचित ठेवून खोटी आश्वासने देणार्या सत्ताधार्यांचा भाजपने पत्रकाद्वारे निषेध केला. ग्रेड सेपरेटरसाठी 60 कोटी कास धरण उंची साठी 48 कोटी भुयारी गटार योजनेसाठी 105 कोटी निधी शासनाने मंजूर केला आहे. शासनाचे कौतुक करणारे एक पत्रही धाडण्यात आले नाही सावि आ च्या या कारभारा विरोधात तीव्र आंदोलन करण्याचा इशारा भाजपचे पालिका प्रतोद धनंजय जांभळे यांनी दिला आहे.