वाई : नुकत्याच पार पडलेल्या जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या निवडणुकीत वाई च्या पश्चिम भागाने भारतीय जनता पक्षाच्या उमेदवाराला भरगोस साथ दिली. भाजपला जरी अपयश आले असले तरी मताची टक्केवारी वाढली असून निवडणुकीत वाईच्या पश्चिम भागातील जनतेला दिलेला शब्द पाळण्यासाठी कटिबध्द असून या भागाचा विकास करण्यासाठी बांधील आहे. करोडो रुपये खर्च करून उभारण्यात आलेल्या जललक्ष्मी योजनेचे काम अतिशय तकलादू झाले असून या योजनेच्या कामात प्रचंड भ्रष्टाचार झाला आहे. जललक्ष्मी योजनेत झालेला भ्रष्ठाचार बाहेर काढण्यासाठी राज्याचे मुख्यमंत्री ना. देवेंद्र फडणवीस यांच्या कडे पाठपुरावा करणार असल्याची ग्वाही भाजपचे जिल्हाध्यक्ष- विक्रमजी पावसकर यांनी वाईच्या पश्चिम भागाचा पाहणी दौर्या दरम्यान या भागातील शेतकर्यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांना उत्तर देताना ही ग्वाही दिली. वाईच्या पश्चिम भागातील जनतेने अनेक प्रश्नांवर जिल्हाध्यक्षांशी सविस्तर चर्चा केली.व या भागातील अपूर्ण असणार्या कामांची पाहणी केली. यावेळी जिल्हा उपाध्यक्ष- काशिनाथ शेलार, युवा नेते- विकास शिंदे, निवृत्त न्यायाधीश- दिनकरराव कांबळे, तालुकाध्यक्ष- सचिन घाटगे, युवा मोर्चाचे वाई शहराध्यक्ष- राकेश फुले, पश्चिम भागातील भाजपचे पदाधिकारी, कार्यकर्ते व ग्रामस्थ या दौर्यात सहभागी झाले होते.
जिल्हाध्यक्ष पावसकर यांनी पश्चिम भागातील धनगरवाडी ते जोर रस्ता, याच रस्त्यावरील पुलाचे काम, बलकवडी गावातील नादुरुस्त पिण्याच्या पाण्याची योजना, वायगाव मधील ग्रामपंचाय त कार्यालयाची इमारत बांधण्यात येणार्या जागेची पहाणी, जल लक्ष्मी योजनेतील विविध ठिकाणी झालेली गळतीची पहाणी, अभेपुरी गावातील साकव पुलाची पहाणी, पाणंद रस्ता या सर्व कामांची पहाणी करून आढावा घेतही अपूर्ण सर्व कामे त्वरित मार्गी लावण्याचे आश्वासन दिले. तसेच वाईच्या पश्चिम भागाची जिव्हाळ्याची असणारया जललक्ष्मी योजनेतील झालेल्या भ्रष्टाचाराची चौकशी करून दोषींवर कारवाई करण्यास भाग पाडणार असेही त्यांनी या भागातील शेतकर्यांना ठोस आश्वासन दिले.यावेळी गणेश जाधव, विठ्ठल बनशेटवार, अशोक वाडकर, दत्तात्रय वाडकर, गणेश सुतार, शंकर वाडकर, प्रकाश वाडकर, सहदेव राजपुरे, भावूसाहेब जंगम, शिवाजी वाडकर, संतोष केळघने, पंकज सणस, नथू यादव, तुकाराम यादव, नारायण सपकाळ, लक्ष्मन जाधव, गोळे मामा, आंनद धनावडे, विलास यादव, संतोष कदम, आनंदा जाधव, यांच्या सह जोर, बलकवडी, परतवाडी, वायगांव, दह्याट, गावचे ग्रामस्त मोठ्या संख्येने उपस्थित होते.