सातारा : राज्यापासून ते केंद्रापर्यंत भारतीय जनता पार्टीला सूज्ञ जनतेने सत्ता दिलेली आहे. त्याचाच एक भाग म्हणून आगामी काळात होत असलेल्या नगरपरिषदांच्या निवडणुकीमध्ये देखील सुज्ञ जनता परिवर्तन केल्याशिवाय राहणार नाही. त्यामुळे भविष्यात सातारा शहराचा नगराध्यक्ष हा भाजपाचाच असेल असा विश्वास शहर अध्यक्ष सुनिल काळेकर यांनी व्यक्त केला.
भाजपा सातारा शहर पदाधिकारी व कार्यकर्ते यांची बैठक आज शासकीय विश्रामगृहात आयोजित केली होती. त्यावेळी ते बोलत होते.
शहर सरचिटणीस विकास गोसावी व विठ्ठल बलशेटवार यांनी नवीन मतदार नोंदणी जास्तीत जास्त करणेसाठी मतदार जागृती अभियान राबवणार असलेचे सांगितले. त्याच बरोबर आगामी काळातील व्यूव्ह रचना आखण्यासाठी प्रभाग निहाय बैठका घेण्याचा निर्णय बैठकीमध्ये घेण्यात आला व इच्छुक उमेदवाराकडून येत्या आठ दिवसांमध्ये स्व: माहिती पत्रक मागवण्यात येणार आहे. यातील सर्व तांत्रिक बाबींची जबाबदारी भाजप कायदा आघाडीचे अध्यक्ष अॅड. खामकर, अॅड. शिंगटे त्याच बरोबर भाजपा जिल्हा उपाध्यक्ष रविंद्र पवार यांच्यावर देण्यात आली आहे.
यावेळी बैठकीस जिल्हा सरचिटणीस विजय काटवटे, अॅड. खामकर, जिल्हा उपाध्यक्ष रविंद्र पवार, युवा मोर्चा शहराध्यक्ष पृथ्वीराज पाटील, उपाध्यक्ष अमोल कांबळे, माजी नगरसेवक जयवंत पवार, शहर उपाध्यक्ष आप्पा कोरे, शहर चिटणीस रोहब आंबेकर, काका पाटील, प्रविण जाधव, अनिकेत निकम, अमित फरांदे, मिलिंद काकडे, शहर सरचिटणीस जयदिप ठुसे यांनी आभार मानले.