राष्ट्रवादीच्या तंबूत दोन्ही राजांनी युध्दबंदी जाहिर केल्यानंतर राष्ट्रवादीची गाडी एका सरळ रेषेत धावायला सज्ज झाली आहे याची दखल घेत भाजपने स्थानिक स्वराज्य संस्थााच्या कालबध्द कार्यक्रमांची गर्ती वाढवली आहे. गेल्या तीन महिन्यापासून गाव तेथे शाखा या अभियानाचा व्यापक आढावा सत्र महसूलमंत्री चंद्रकातदादा पाटील यंानी सुरू केले असून या मोहिमेपाठीमागे सक्षम उमेदवार शोधण्याचा अजेंडा राबवला जात आहे. लोणंद नगरपंचायतीत दोन सदस्यांद्वारे जिल्हयाच्या राजकारणात भाजपने पक्ष चिन्हावर स्वतंत्रपणे पहिल्यांदाच एन्ट्री केली आहे. जिल्हयात व राज्यात आज भाजप पक्ष सत्तेत असल्याने राष्ट्रवादीला खरी स्पर्धा भाजपचीच असणार आहे. मनसे, शिवसेना,रासप, कॉग्रेस या अन्य पक्षांचा अजेंडा अद्याप जहिर झाला नसला तरी प्रत्येक पक्ष स्वबळाची भाषा बोलत आहे. राष्ट्रवादी व काँग्रेस यांची गेल्या दशकभराची आघाडी केंद्रात, राज्यात अगदी जिल्हयात सत्तेमधे टिकून होती. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या सातारा, सांगली विधानसभा मतदार संघात जागा वाटपावरून काँग्रेस व राष्ट्रवादी यंाच्यात ओढाताण सुरू आहे. याचा फायदा उठवण्यासाठी भाजपने पध्दतशीरपणे मोर्चेबांधणी सुरू आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पक्षाध्यक्ष अमित शहा यांच्या सुचनेनुसार पश्चिम महाराष्ट्राच्या राजकीय हालचालींचा स्वतंत्र आढावा बारकाईने घेण्याचा सुरूवात केली असून गाव तेथे शाखा व संपर्क अभियान या माध्यमातून सातारा जिल्हयात किमान 15 लाख सदस्यनोंदणी व त्यातून संघटनात्मक बांधणी असा दुहेरी अजेंडा साधला जाणार आहे. सातारा शहरातही हीच परिस्थिती आहे. मनोमिलनाकडे ज्याप्रमाणे तगडया उमेदवारांचा मोठा फौजफाटा आहे. वाई, कराड, फलटण, रहिमतपूर, खंडाळा येथे राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्याचे व्यापक जाळे आहे. त्यामुळे सक्षम उमेदवार शोधणे हे राष्ट्रवादीला निश्चितच अवघड नाही. सातारा जिल्हा परिषदेत गट आरक्षणाच्या तडाख्याने 14 तामब्बर व गणांच्या आरक्षणात 34 सदस्यांवर थांबण्याची वेळ आली. अशा सदस्यांच्या शिवाय वेगळी काय चाचपणी करता येईल याचा आराखडा भाजप जिल्हाध्यक्ष विक्रम पावसकर यांनी तयार करण्यास सुरूवात केली आहे. आणि त्याची अंमलबजावणी कराड शहरातून सुरू झाली आहे. पावसकर हे विद्यमान नगरसेवक असून त्यांच्या मागे कार्यकर्त्याचे मोठे पाठबळ आहे. नुकत्याच झालेल्या त्यांच्या वाढदिवसानिमित्त कराडात भाजपचे मोठे शक्तीप्रदर्शन झाले. हे शक्तीप्रदर्शन आ. बाळासाहेब पाटील यांना एक प्रकारचा इशाराच होता. त्यात अखिल भारतीय ओबीसी युवा संघटनेचे संग्राम माळी व फलटणमधे काँग्रेसचे कट्टर कार्यकर्ते चिमणराव कदम यांचे चिरंजीव सह्याद्री कदम यांना आपल्या गोटात ओढून भाजपने युवा बिग्रेडची मोट बांधण्याचा प्रयत्न चालवला आहे. क्षेत्रमाहूलीचे पंचायत समिती सदस्य संतोषभाऊ जाधव यांनीसुध्दा कॉग्रेसच्या राजकारणाला कंटाळून भाजपात प्रवेश केला.या अनेक हालचालींमुळे भाजप राष्ट्रवादीला तगडी टक्कर देवू शकेल अशी परिस्थिती निर्माण करण्याचा पुरेपुर प्रयत्न होत आहे. अगदी फलटणमध्येही भाजप राजेगटाच्या विरोधकांना चुचकारून कमळाच्या झेंडयाखाली आणू पाहत आहे. चिमणराव कदम यांचे कार्यकर्ते राजे गटाला जोरदार विरोध करणार व रासपच्या माध्यमातून महादेव जानकर मंत्रीपदाला जागून भाजपला ताकद देणार हे सोयीस्कारपणे पालिका निवडणूकांच्या निमित्ताने दिसणार आहे. अनेक नवे चेहरे पक्षांत घेताना त्यांचे इलेक्टिव्ह मेरीट लक्षात घेतले जात आहे. सातारा शहरातही भाजप कार्यकर्त्याचे मोठमोठे होर्डिंग लागू लागले असून अगदी ठळक जाहिरनामे प्रसिध्द होवू लागले आहेत. त्यामुळे राष्ट्रवादी विरूध्द भाजप असा दुरंगी सामना सध्यातरी जिल्हयाच्या पटलावर दिसत आहे.
भाजपकडून जिल्हयात नव्या चेहर्यांचा शोध
RELATED ARTICLES