सातारा ः बिल्डर्स असोसिएशन ऑफ इंडिया सातारा शाखेच्या अध्यक्षपदी अशोक शिंदे यांची तर सेक्रेटरीपदी श्रीराज दिक्षित यांची एकमताने निवड करण्यात आली आहे. असोसिएशनच्या उपाध्यक्षपदी अनुप शिंदे, खजिनदारपदी साहिल शेख यांची तर 2019-20 च्या कौन्सिल मेंबर्ससाठी मावळते अध्यक्ष सयाजी चव्हाण यांची निवड झाली आहे. शुक्रवार दि. 26 एप्रिल 2019 रोजी सायंकाळी 6 वाजता श्री विठ्ठल मंगलम मल्टिपरपज हॉल येथे आयोजित शानदार कार्यक्रमात या सर्वांचा पदग्रहण समारंभ होणार आहे.
पदग्रहण समारंभास नूतन अध्यक्ष अशोक शिंदे व त्यांची सर्व टीम व ऑफीस बेअरर यांना त्यांच्या पदाची सूत्रे मावळते अध्यक्ष सयाजी चव्हाण व सेक्रेटरी नितीन माने हे प्रदान करण्यात येणार आहेत. या समारंभास बिल्डर्स असोसिएशन ऑफ इंडिया ऑल इंडियाचे वेस्ट झोन चे व्हाईस प्रेसिडेंट निमिश पटेल, बिल्डर्स असोसिएशन ऑफ इंडिया महाराष्ट्र अध्यक्ष प्रकाश पंजवानी, कालिका स्टीलचे संचालक अनिल गोयल व अन्य मान्यवर यांच्या उपस्थितीत पदाधिकार्यांना पदाची सूत्रे प्रदान करण्यात येणार आहेत. सदर कार्यक्रमात बिल्डर्स असोसिएशनच्या वुमन्स विंग स्फुर्तीचा शुभारंभही होणार आहे.
बिल्डर्स असोसिएशन ऑफ इंडिया सातारा शाखेच्या अध्यक्षपदी अशोक शिंदे, सेक्रेटरीपदी श्रीराज दिक्षित, उपाध्यक्षपदी अनुप शिंदे, खजिनदारपदी साहिल शेख, कौन्सिल मेंबरपदी सयाजी चव्हाण यांची तर एक्झीक्युटिव्ह कमिटी मेंबरपदी तृप्तेश कदम, पृथ्वीराज पाटील, अजिनाथ शिराळ, ओंकार शिंदे, राजेंद्र शिंदे, सुरेश सुतार, संदीप जाधव, मनोज जैन, शशिकांत पाटील, कौस्तुभ मोरे, अनुप पोरे, संदीप जाधव, मनिषशेठ महाडवाले यांची निवड झाली आहे. या कार्यक्रमास बिल्डर्स असोसिएशनचे सातारा, पुणे, मुंबई, कोल्हापूर, सांगली, कराड, वाई, फलटण, बारामती येथील पदाधिकारी, सदस्य व मान्यवर मोठया संख्येत उपस्थित राहणार आहेत.
उद्या मान्यवरांच्या हस्ते होणार शानदार कार्यक्रमात पदग्रहण
RELATED ARTICLES

