Thursday, April 18, 2024
Homeताज्या घडामोडीपार येथे श्रीरामवरदायिनीची यात्रा दि.2 मे ते दि.10 मे अखेर

पार येथे श्रीरामवरदायिनीची यात्रा दि.2 मे ते दि.10 मे अखेर

सातारा:श्रीक्षेत्र पार्वतीपुर पार,ता.महाबळेश्वर येथील आदिशक्ती श्रीरामवरदानीची वार्षिक यात्रा गुरुवार दि.2 मे पासून सुरू होत असून शुक्रवार दि. 10 मे अखेर विविध कार्यक्रमाने संपन्न होणार आहे.तेव्हा परिसरातील भाविकांनी लाभ घ्यावा.असे आवाहन संयोजकांनी केले आहे.
गुरुवार दि.2 रोजी सकाळी 7 वा.श्री रामवरदायीनी माता व सर्व देवदेवतांना अभिषेक,सायंकाळी 4 वा.सत्यनारायणाची महापूजा, 7 वा.गावातून पालखी मिरवणूक,रात्री श्रीची काठी मिरवणूक.शुक्रवार दि.3 रोजी सकाळी 9 वा.43 गावातील देवांचे विडे वर्तवणे.शनिवार दि.4 रोजी सकाळी 9 वा.श्रीची महापूजा,रात्री 9 ते 11 पर्यंत विविध गावातील देवतांचे आगमन,11 वा.बगाड व तदनंतर आदिशक्ती युवा प्रतिष्ठानतर्फे सुमधुर गीतांचा कार्यक्रम.रविवार दि.5 रोजी सकाळी 11 वा.श्रीची आरती,रात्री 9 वा.करंड ढोल लेझीम आरती व 11 वा.संजय पवार(पुणे) यांचे सांप्रदायिक बहुरंगी भारुड.सोमवार दि.6 वा.सकाळी 11 वा.श्रीची आरती,रात्री 9 वा.करंड ढोल आरती, मास्टर तानाजीराव भोसले(वाघेरीकर)यांचा लोकनाट्य.मंगळवार दि.7 रोजी सकाळी 11 वा.फश्रीफची आरती,सायंकाळी 4 वा.हळदी कुंकू,रात्री 9 वा.करंड ढोल लेझीम आरती तदनंतर भोसले यांचा लोकनाट्य.बुधवार दि.8 रोजी सकाळी श्रीची आरती,रात्री 9 वा.करंड ढोल लेझीम आरती व त्यानंतर भोसले यांचा लोकनाट्य.गुरुवार दि.9 रोजी सकाळी 11 वा.दुपारी 3 वा.होमहवन व इतर विधी,रात्री 9.30 वा.शालेय सांस्कृतिक कार्यक्रम,11वा.बक्षीस समारंभ व त्यानंतर वाघेरीकर यांचा लोकनाट्य.शुक्रवार दि.10 रोजी पहाटे 5 वा.पालखी मिरवणूक,सकाळी 10 वा.लळित,लघुरुद्राभिषेक होम समाप्ती , दुपासरी 12 नंतर भोजन व यात्रेची सांगता.

Chandrasen Jadhav
Chandrasen Jadhavhttp://GramodhharNews.com
Continuing family legacy of Dainik Gramodhhar Chandrasen Jadhav has been associated with it since last 6 years. He is the Chief Editor & looks after Online News Edition of GramodhharNews.com operated from Satara.
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular