महाबळेश्वर : महाबळेश्वर तालुक्यातील देवळी मुरा गावातून आपल्या मुळ गावी चालत निघालेल्या मजुरांचा एक लोंढा दि . १३ रोजी महाबळेश्वर येथील स्थानिक पत्रकारांच्या नजरेस पडला, विचारपुस केली आसता ठेकेदारांकडून या मजुरांची फसवणुक झालेले निदर्शनास आले. धुमाळ व मनसुक या नावाने ओळख असलेल्या दोन ठेकेदारांनी या मजुरांस देवळी मुरा या गावी बंगल्याची कोपिंग व पायटींग करण्यासाठी आणले होते. जवळजवळ २५ ते ३० लोक या ठिकाणी काम करत होते. परंतु मध्येच कोरोनाच्या पार्श्व भूमीवर काम बंद करण्यात आले. काम बंद झाल्यानंतर या दोन ठेकेदारांनी या मजुरांना आहे तेथेच राहण्यास सांगितले सुरवातीस या मजुरांना त्या ठेकेदारांनी ३ ते ४ दिवस पुरेल एवढे अन्न धांन्य दिले. परंतु त्या नंतर संबंधित ठेकेदारांनी या मजुरांकडे पुर्णतः पाठ फिरवली , ना त्यांची राहण्याची व्यवस्थित सोय केली ना त्यांना अन्न धान्य पुरविले दरम्यानच्या काळात या मजुरांनी आपल्या ठेकेदारांना फोन केला असता ठेकेदारांनी उडवा ऊडविचे उत्तर देण्यास सुरवात केली.
त्यांना कुठलेही ठोस असे उत्तर मिळाले नाही , या मजुरांनी आपल्या उर्वरित पैश्यांची ठेकेदारांकडे मागणी केली आसता तुमच्या अकाउंटला पैसे पाठवतो असे सांगत येणारा दिवस ढकलत नेला . त्या मुळे या मजुरांवर शेवटी उपासमारीची वेळ आली , गावातील लोकांनी त्यांना थोडी फार मदत केली परंतु ती पुरेशी नव्हती. २ ते ३ वर्षाची लहान मुले देखील त्यांच्या बरोबर असल्या कारणाने , त्यांची काळजी लक्षात घेता या मजुरांनी शेवटी चालत आपलं गाव गाठण्याचा निर्णय घेतला व त्या पद्धतीने ते चालत आपल्या गावी जाण्यासाठी निघाले. परंतु मध्येच पत्रकारांनी व काही स्थानिक लोकांनी त्यांची विचारपुस केली असता घडलेला सगळा प्रकार उघकीस आला . हा लोंढा महाबळेश्वर येथे पोहचल्या नंतर या लोकांना तेथील टॅक्सी युनियनचे सदस्य चंद्रकांत ढेबे व क्राईम पेट्रोल न्युज मराठी चॅनल प्रतिनिधी बाजीराव उंबरकर यांनी आप – आपल्या परीने थोडीफार मदत केली. तसेच शरद झावरे , राजेंद्र कदम , आत्माराम केळगणे यांनी या लोकांना पुढील दोन दिवस राहण्याची सोय गावकऱ्यांमार्फत ते होते त्या ठिकाणीच करून दिली. त्याच प्रमाणे सातारा मेढा या चेक नाक्यावरील काही नगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांनी या मजुरांची खाण्या पिण्याची सोय केली. प्रशासनाने देखील या प्रकरणात जातीने लक्ष घालून त्यांना लवकरात लवकर त्यांच्या मुळगावी पाठवण्यास जे पास लागतील ते पास देण्याची प्रक्रिया सुरु केली.
त्या मुळे पुढील दोन दिवसांत या लोकांना त्यांच्या मुळगावी जाण्यास मदत होणार आहे. तसेच या मजुरांना त्यांचे पास मिळे पर्यंत , देवळी मुरा या गावचे पोलिस पाटील व सरपंचांनी आपल्याच गावात राहण्याची सोय करुन देऊन माणुसकीचे एक सुंदर उदाहरण जगासमोर ठेवले आहे असेच म्हणावे लागेल. या संपुर्ण प्रकरणात प्रशासन व पत्रकारांनी या मजुरांना सर्वोतोपरी मदत केली व त्यांना न्याय मिळवुन दिला .
परंतु आता त्या दोन ठेकेदारांवर कश्या पद्धतीने कारवाई केली जाईल व आश्या घाणेरड्या प्रवृत्तीच्या लोकांना कशी जरब बसेल हे पाहणे गरजेचे बनले आहे.
फसवणूक झालेल्या बांधकाम मजुरांना स्थानिक पत्रकारांमुळे मिळाला आधार ; महाबळेश्वर तालुक्यातील घटना
RELATED ARTICLES