70 वा चार्टर्ड अकौंटंट डे सातारा येथे उत्साहात संपन्न

सातारा : येथील वेस्टर्न इंडिया रिजनल कॉन्सीलच्या इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकौंटंटस ऑफ इंडिया संस्थेच्यावतीने 70 वा चार्टर्ड अकौंटंट डे सोमवार दि. 1 जुलै रोजी उत्सहात साजरा करण्यात आला.
या निमित्त संस्थेच्या राधिका रोडवरील सातारा शाखेत सकाळी 9 वाजता संस्थेचे चेअरमन सीए अतुल दोशी, सातारा जिल्ह्याचे सरकारी वकील अ‍ॅड. महेश कुलकर्णी, संस्थेचे सचिव ऋषिकेश वांगडे, खजिनदार जीवन जगताप व मान्यवर ज्येष्ठ सदस्यांच्या हस्ते ध्वजारोहण संपन्न झाले. त्यानंतर मोटो साँग होवून उपस्थित मान्यवरांच्या हस्ते दिपप्रज्वलन करुन ीरींरीरळलरळ.ेीस या वेबसाईटचा उद्घाटन सोहळा संपन्न झाला.
आपल्या प्रस्ताविक भाषणात बोलताना अतुल दोशी म्हणाले की, देशाला स्वतंत्र मिळाल्यावर लगेचच सीए कायदा पास झाला व या कायद्याच्या अनुशंगाने या संस्थेची निर्मिती झाली. लेखा परिक्षणाचे क्लिष्ट काम वर्षभर करत असताना सदस्यांच्या सहकार्याने आज ही संस्था विविध समाजाभिमुख उपक्रम राबवत आहे. याचा विशेष आनंद होतो.
उपस्थितांना मार्गदर्शन करताना जिल्हा सरकारी वकील अ‍ॅड. महेश कुलकर्णी म्हणाले की, वकील आणि लेखापरिक्षक हे दोन्हीही खर्‍या अर्थाने एकमेकांना सलग्न अशी सेवा क्षेत्रे आहेत. वैयक्तिक, संस्था पातळीवर कार्यरत असताना देशाचे व समाजाचे आपण देणे लागतो. या भूमिकेतून ही सेवा क्षेत्रै महत्वाची भूमिका बजावत आहेत. आजच्या वर्धापनदिनी मी आपल्या सर्वांना शुभेच्छा देतो. यावेळी संस्थेचे ज्येष्ठ लेखापरिक्षक सर्वश्री डी. बी. खरात, अजित रानडे, एल. पी. येवले, के. एल. सावंत, सी. व्ही. काळे, सुरेश कटारीया,शिरीष गोडबोले यांचा सत्कार अतुल दोशी व महेश कुलकर्णी यांच्या हस्ते सन्मानचिन्ह देवून करण्यात आला. सत्करा नंतर या सर्व मान्यवरांनी आपली मनोगते व्यक्त करुन संस्थेच्या कार्याबद्दल गौरवोद्गार काढले आणि भविष्यातील होवू घातलेल्या लेखापरिक्षकांच्या कारर्कीदीसाठी सुयश चिंतले.
संस्थेच्या सभागृहात माउली ब्लड बँकेच्या सहकार्याने रक्तदान शिबिर संपन्न झाले. यात संस्थेच्या मान्यवरांनी तसेच विद्यार्थ्यांनी रक्तदान केले. त्यानंतर न्यू इंग्लिश स्कूल येथे वृक्षारोपणाचा कार्यक्रम संपन्न झाला. सायंकाळी सुप्रसिध्द मधुमेह तज्ञ डॉ. जयदीप रेवले यांचे मधुमेहास अटकाव व त्यासाठी करावयाचे व्यवस्थापन या विषयावर व्याख्यान होवून सर्व सी.ए. सदस्य व परिवाराचे स्नेहभोजन आयोजित करण्यात आले होते. वर्धापनदिनाच्या यशस्वी संयोजनासाठी संयोजन समितीच्या सदस्यांनी विशेष परिश्रम घेतले. या कार्यक्रमासाठी ज्येष्ठ लेखापरिक्षक एस. बी. गोखले, अ‍ॅड. द्रविड, श्री कुलकर्णी, श्री. शहा यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.