पाटण : पाटण ग्रामीण रूग्णालयात गेले दोन आठवडे लसीकरण न झाल्याने समस्त माता भगिनी आपल्या बालकांना घेऊन ग्रामीण रूग्णालयाचा दारात बसल्याचे चित्र गेली तीन सोमवार पाहायला मिळत आहे. आरोग्य केंद्राचा या ढसाळ कारभारामुळे पालकांमधून संताप व्यक्त होत आहे. जागतिकरणाच्या दृष्टीने वाटचाल करताना आजची युवा पिढी ही अत्यंत महत्त्वाची आहे त्यांचा पालन पोषणाला शासन मदत ही करते तसेच आजची बालके ही उद्याची संपत्ती आहे बालकांना पोलिओ मुक्त करणे तसेच सर्व लसी वेळच्या वेळी देणे हे काम आरोग्य सेविका, आरोग्य कर्मचारी व अंगणवाडी कर्मचारी वर्गात यांचांकडे सोपवण्यात आलेले आहे परंतु यांचा मनमानी कारभारामुळे व वैद्यकीय सेवेंच्या व लसीकरणाचा अपुरेपणा मुळे यांचा त्रास सर्व सामान्य नागरिकांना सहन करावा लागत आहे.
बालके जन्माला आल्यापासून ते अगदी पाच वर्षी ची होईपर्यंत त्यांना लसीकरण करणे गरजेचे आहे. पर्यंत काही भागात याबाबत उदासिनता दिसून येते आज पाटण सारख्या तालुका स्तरावरील ठिकाणी ग्रामीण रूग्णालयात गेली दोन आठवडे लसीकरण झालेले नाही ही अत्यंत खेदजणक बाब आहे. सोमवार हा आठवडी बाजार चा दिवस तसेच लसीकरण ही सोमवारी ग्रामीण रूग्णालयात होते त्यामुळे आसपासच्या महिला येथे बालकांना घेउन येतात तसेच लसीकरण लवकरच सुरु होते म्हणून समस्त महिला वर्ग सकाळी 9 वाजल्यापासून आपल्या लहानग्या बाळासहीत येथे वाट पाहत बसल्या होत्या मात्र लसीकरण करणार्या चां मात्र काही पत्ता नव्हता. ग्रामीण रूग्णालयाचा परिसरात 30 ते 40 महिलांची लसीकरणासाठी रांग होती मात्र तिथे कर्मचारी उपलब्ध नसल्यामुळे त्यांना ताटकळत बसावे लागले. दर सोमवारी लसीकरण होते मात्र दोन सोमवारी लसीकरण झाले च नाही. यांचा या ढसाळ कारभारामुळे त्याचा त्रास या बालकांना व त्यांच्या मातांना सहन करावा लागला. या दोन सोमवार लसीकरण न झाल्याने दोन आठवडे वाया गेले त्यामुळे काही बालकांचे महिने पालटून गेले त्यास जबाबदार कोण असा संतप्त प्रश्न पालकांमधून उपस्थित होत आहे. याबाबत अधिकारी वर्गाशी संपर्क साधला असता समाधान कारक उत्तरे ही दिली जात नाही हे मोठे दुर्दैव म्हणावे लागेल.
तिसर्या ही सोमवारी जेव्हा लसीकरण होणार नाही हे समजताच लोकांनी आक्रमक होऊन प्रशासणाला जाब विचारला परंतु आजही लसीकरण होणार नाही हे उत्तर त्यांना मिळाले. मग तिथे उपस्थित एका नागरिकाने आरोग्य विभागाचा तक्रार निवारण केंद्रामध्ये तक्रार नोंद केली. तसेच काही वेळात मोरगिरी आरोग्य केद्रांची टिम इथे हजर झाली व लसीकरणास सुरुवात झाली. संबंधित घटनेने आरोग्य केंद्राचा कारभार कसा चालतो हे मात्र सर्व सामान्य महिलांचाही लक्षात आला.
खाजगी दवाखान्यातील लसींचा दर अव्वाचा सव्वा तसेच सर्व सामान्य लोकांच्या खिशाला परवडणारा नसल्यामुळे ग्रामीण रूग्णालय लोकांना जवळचे वाटते इथल्या लसी ही मोफत स्वरूपात असल्याने सर्व सामान्य लोकांना सगळेच सोईस्कर वाटते परंतु आरोग्य केंद्राचां हा बेजबाबदार पणा सर्व सामान्य लोकांच्या जीवाशी खेळल्यासारखा आहे.