परळी :- मौजे रायघर (ता. जि. सातारा) येथे दोन कोरोना पौजिटिव्ह पेशंट सापडल्याने संपूर्ण गाव कंटेंमेंट / येण्या जाण्यासाठी प्रतिबंधित क्षेत्र म्हणून जाहीर केले असून गावामध्ये आवश्यक भाजीपाला मौजे रायघर येथील सामाजिक कार्यकर्ते श्री शिवाजी खाशाबा कदम यांनी रायघर गाव कोरोना कंटेंमेंट झोन असे पर्यंत विनामूल्य देण्याचे जाहीर केले असून त्याप्रमाणे आज भाजीपाला पुरवठा केला. रायघर गावामध्ये 35 घरे असून लोकसंख्या 128 आहे .डोंगराच्या कुशीत वसलेले दुर्गम भागातील गाव आहे. लोकांची परिस्थिती बेताची आहे . घरातील मुंबईमधील व्यक्तीवर कुटुंबे अवलंबून आहेत. या उपक्रमाचे ग्रामीण भागातून कौतुक केले जात आहे.
समाजातून यावेळी सामाजिक कार्यकर्ते श्री शिवाजी कदम ग्रामसेवक श्री अभिजित ढेंबरे आशासेविका सौ पिंपळे स्वयंसेवक हजर होते.गावामध्ये जीवनावश्यक वस्तूंच्या पुरवठा करण्यात आला आहे .एक दिवसाआड गावामध्ये औषध फवारणी करून गावामध्ये नियमित निर्जंतुकीकरण करण्यात येत आहे. पंचायत समिती गटविकास अधिकारी श्री संजय ढमाळ , श्री शंतनू राक्षेविस्तार अधिकारी (ग्रामपंचायत)व इतर शासकीय विभाग यांचे नियमित मार्गदर्शन व सहकार्याने परिस्थिती नियंत्रणात आहे.
सामाजिक कार्यकर्ते शिवाजी कदम धावले रायघरच्या मदतीला ; कंटेंटमेट झोन असे पर्यंत रायघर येथे देणार विनामूल्य भाजीपाला
RELATED ARTICLES