परळी :- सातारा तालुक्याला कोरोनाची मगर मिठी अधिकच घट्ट होत असताना परळी खोऱ्यातील बाधितांच्या आखाड्यात गेल्या काही दिवसांपासून वाढ होत आहे. परळी खोऱ्याची चिंता वाढवणारी गोष्ट म्हणजे हे सर्व बाधित मुंबईहून प्रवास करून आलेले असून यांच्या नवीन साखळ्या भागात तयार होत आहेत. त्यातच 30 मे रोजी रात्री उशिरा आलेल्या रिपोर्टनुसार वावदरे येथील आणखी एक नवीन पुरुष तर खडगाव येथील निकटसहवसीत 21 वर्षीय युवती बाधित आढळल्याने भागात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
वावदरे येथील सदर व्यक्ती ही ट्रॅव्हलिंग हिस्ट्री मधील असून 23 मे रोजी मुंबई येथून वावदरे येथे आपल्या गावी आली होती. तदनंतर 29 मे रोजी त्या व्यक्तीस ताप थंडी खोकला आल्याने आशा तसेच आरोग्यसेविका यांनी तत्काळ सदर व्यक्तीस ठोसेघर प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले. वैद्यकीय अधिकारी डॉक्टर मानसी पाटील यांनी ही लक्षणे कोरोना सदृश्य असल्याचे आढळताच त्यांनी या व्यक्तीस जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले शनिवारी रात्री उशिरा आलेल्या रिपोर्टमध्ये सदर व्यक्ती ही कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे समजताच भागात थरकाप उडाला होता या व्यक्तीच्या हाय रिस्क मधील त्याच्या कुटुंबातील दोन व्यक्ती, वेणेखोल (परळी) येथील दोन जण तर लो रिस्क मधील भोंडवडे येथील एक जण यास विलगीकरण कक्षात दाखल करण्यात आले आहे.
खडगाव येथील युवती ही पाहिल्या बधीय युवतीच्या निकटसहवासीत असून खडगाव येथील वाढती साखळी ही खडगावसह परळी खोऱ्याला घोर लावणारी आहे. या युवतीच्या हाय रिस्क मधील दोन तसेच लो रिस्क मधील सहा जणांना विलगीकरण कक्षात दाखल करण्यात आले होते.