सातारा दि. 8 (जिमाका): जिल्ह्यात काल रात्री 12 वाजेपर्यत जाहीर करण्यात आलेल्या रिपोर्टनुसार 2379 नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित आले असून 44 बाधितांचा मृत्यु झाला असल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा परिषद, यांनी दिली आहे.
तालुकानिहाय कोरोना बाधितांची संख्या तर आज अखेर बाधित रुग्णांची संख्या कंसामध्ये पुढील प्रमाणे. जावली 102 (5760), कराड 270 (17761), खंडाळा 176 (7419), खटाव 216 (10436), कोरेगांव 228 (10186),माण 129 (7741), महाबळेश्वर 27 (3511), पाटण 143 (5063), फलटण 436 (15952), सातारा 446 (27286), वाई 176 (9031 ) व इतर 30 (670) असे आज अखेर एकूण 120824 नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित आहेत.
तसेच आज मृत्यू झालेल्या बाधितांची संख्या तर आज अखेर मृत्यू झालेल्या रुग्णांची संख्या कंसामध्ये पुढील प्रमाणे. जावली 0 (108), कराड 10 (495), खंडाळा 2 (94), खटाव 5 (289), कोरेगांव 2 (257), माण 4 (159), महाबळेश्वर 0 (36), पाटण 3 (128), फलटण 3 (206), सातारा 12 (826), वाई 3 (228) , व इतर 0, असे आज अखेर जिल्ह्यामध्ये एकूण 2828 कोरोना बाधितांचा मृत्यू झाला आहे.
*1936 नागरिकांना दिला आज डिस्चार्ज*
सातारा दि. 8 (जिमाका): जिल्ह्यात विविध रुग्णालयात आणि कोरोना केअर सेंटर, डिसीएचसी व सीसीसीमध्ये उपचार घेत असलेल्या आज संध्याकाळपर्यंत 1936 नागरिकांना घरी सोडण्यात आले असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली.
*एकूण नमुने -592238*
*एकूण बाधित -120804*
*घरी सोडण्यात आलेले -96070*
*मृत्यू -2828*
*उपचारार्थ रुग्ण-21847*