राज्य सरकारने कर्मवीरांना भारतरत्न पुरस्काराचा ठराव करावा -: राजेश भोसले यांची कर्मवीर कृतज्ञता अभियाना अंतर्गत मागणी

सातारा :- सुमारे १०० वर्षापूर्वी सर्व जाती धर्मातील विद्यार्थ्यांसाठी गाव तिथे शाळा हे उद्दिष्ट ठेऊन शिक्षणाची गंगा तळागाळातील विद्यार्थापर्यंत रयत शिक्षण सस्थेमार्फत पोहचविण्याचे अनमोल कार्य करणारे आधुनिक भगिरथ तिर्थरुप पदम् भूषण डॉ.कर्मवीर भाऊराव पाटील यांना मरणोत्तर भारतरत्न पुरस्कार जाहीर करण्यासाठी आम्ही कर्मवीर कृतज्ञता अभियाना अंतर्गत २००७ पासून आशिया खंडातून सलग १४ वर्ष तत्कालिन राष्ट्रपती पंतप्रधान यांना निवेदने तसेच देशभरातून पाच लाख पञाद्वारे मागणी करत आहोत.याच बरोबर आपल्या महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंञी व मंञीमंडळ यांनाही वारंवार निवेदने दिली आहेत.पंतप्रधान कार्यालया कडून मिळालेल्या माहीतीनुसार देशांतर्गत महान कार्य केलेल्या व्यक्तिस भारतरत्न पुरस्कार दिला जातो.त्यावर उत्तर म्हणजे कर्मवीरांनी रयत शिक्षण संस्थेच्या माध्यमातून घडविलेले कित्येक विद्यार्थी जगातल्या अनेक देशात उल्लेखनीय कार्य करीत आहे म्हणजेच कर्मवीरांचे कार्य भारत देश नव्हे संपूर्ण जगभरात पसरले आहे.म्हणूनच आपण आपल्या राज्यसरकारचा मंञीमंडळाचा कर्मवीरांना भारतरत्न पुरस्काराचा ठराव करुन पंतप्रधान कार्यालयाला पाठवावा ही नम्र विनंति. आपण आता कर्मवीर भाऊराव पाटील समूह विद्यापीठास मान्यता देऊन कर्मावीरांचे स्वप्न साकार केल्याबाद्दल हार्दिक अभिनंदनाचे पञ व निवेदन रयत शिक्षण संस्थेचे अध्यक्ष आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब,महाराष्ट्र राज्याचे सन्माननिय मुख्यमंञी उध्ववजी ठाकरे उपमुख्यमंञी अजितदादा पवार माजी मुख्यमंञी अशोकजी चव्हाण यांना दिल्याची माहिती कर्मवीर कृतज्ञता अभियान महाराष्ट्र राज्यचे संस्थापक अध्यक्ष राजेश भोसले यांनी दिली आहे