Thursday, June 19, 2025
HomeUncategorizedकूस खुर्द येथील 3 बाधित झाले कोरोना मुक्त

कूस खुर्द येथील 3 बाधित झाले कोरोना मुक्त

परळी :- कोरोना आपल्या भागात हात पाय पासरतोय असं म्हटलं तरी भल्या-भल्यांच्या आंगावर काटा येतो. कोरोना हा मुख्य करून वयस्कर तसेच लहान मुलांना केंद्रीत करत आहे. परंतु कूस खुर्द येथील 76 वर्षीय आजींनी कोरोनाला पराभूत केल्याने भागात एकच उत्साह दिसून आला.
कूस खुर्द येथील सदर कुटुंब 15 मे रोजी मुंबई येथून आपल्या गावी आले होते. गावात आल्यापासूनच सर्वजन होम कॉरन्टीन होते. घरातील 48 वर्षीय व्यक्तीस त्रास जाणवू लागल्याने त्या व्यक्तीस डॉक्टर सचिन यादव यांच्या सूचनेनुसार जिल्ह्या शासकीय रुग्णालयात दाखल केले. ही व्यक्ती बाधित असल्याचे समजताच घरातील 4 निकट सहवासीत विलगीकरण कक्षात झालं करण्यात आले त्यानंतर त्यातील 76 वर्षीय आजीनंसह दोघांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याने एकाच कुटुंबातील चार जण बाधित असल्याचे समजतात भागात भीतीचे वातावरण पसरले होते. परंतु मंगळवार 2 जून रोजी दुपारी आलेल्या रिपोर्टनुसार 76 वर्षीय आजी बरोबर त्यांच्या घरातील दोन जण कोरोना मुक्त झाल्याने भागात सकारात्मक वातावरण निर्माण झाले होते.
सदर कुटुंबियांचे रिपोर्ट निगेटिव्ह आल्यानंतर त्यांना कूस खुर्द येथे आपल्या घरी सोडण्यात आले. सदर कुटुंबीय गावात दाखल होताच ग्रामस्थांनी टाळ्यांच्या गजरात स्वागत केले. तसेच ही कोरोनाची साखळी वाढू न देता तत्काळ उपाययोजना केल्यासाठी परळी येथील वैधकीय अधिकारी, आरोग्य कर्मचारी यांचे देखील आभार मान्यता आले.

Chandrasen Jadhav
Chandrasen Jadhavhttp://GramodhharNews.com
Continuing family legacy of Dainik Gramodhhar Chandrasen Jadhav has been associated with it since last 6 years. He is the Chief Editor & looks after Online News Edition of GramodhharNews.com operated from Satara.
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular