सातारा : सिक रजेवरुन कर्तव्यावर हजर करुन घेणे करीता लाच मागणी केल्याने तसेच इलेक्ट्रॉनिक साहित्य व मोबाईल फोन काढून घेवून त्याची मोडतोड केल्याने वाई तालुक्यातील बावधन प्राथमिक आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकारी डॉ. आशा गिन्यानदेव बांगर तसेच खाजगी इसम अंकुश काळुराम जाधव यांच्यावर लाच प्रतिबंध कायदयान्वये व भारतीय दंड विधान संहिता कलमान्वये सातारा लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने कारवाई केली आहे.
तक्रारदार यांनी दिलेल्या तक्रारीनुसार सिक रजेवरुन कर्तव्यावर हजर करुन घेण्याकरीता डॉ.आशा गिन्यानदेव बांगर वय 34, वैद्यकीय अधिकारी, प्राथमिक आरोग्य केंद्र बावधन ता.वाई, जि.सातारा येथील वर्ग-3 ग्रामविकास खाते आरोग्य विभाग जिल्हा परिषद सातारा यांनी 1,00,000/- रुपये लाचेची मागणी केल्याबाबत तक्रारदार यांनी एसीबी साताराकडे दिनांक 30 जून 2016 रोजी तक्रार अर्ज दिला.