साताऱ्यात वशिलेबाजीच्या लसीकरणाची चौकशी व कडक कारवाई होणार का ?   

सातारा दि४ : सातारा जिल्ह्यातील गरीब, कष्टकरी व सामान्य माणूस लसीकरणापासून वंचित आहेत. तर दुसऱ्या बाजूला वशिलेबाजी ने अनेकांनी लस उपलब्ध झाली आहे. या  प्रकाराची चौकशी व कारवाई होणार का? असा प्रश्न विविध संघटना व सामान्य माणूस करीत आहेत.                                                     या बाबत जाणकार मंडळींनी सांगितले की, गेली पंधरा ते वीस दिवसापासून ऑनलाइन पद्धतीने लसीकरणासाठी नाव नोंदविली आहे. ज्या दिवशी वेळ व ठिकाण सांगितले आहे. तिथे गेल्यावर लस शिल्लक राहिली नाही. असे सांगून बोळवण केली जात आहे. सेवा निवृत्त जवान,अधिकारी, कर्मचारी, जिल्हा प्रशासन, आरोग्य, पोलीस विभाग व प्रसार माध्यमातील प्रतिनिधी यांनाही ऑनलाइन नोंदणी करून लस नाही,                                                                                                  पत्रकार इतरांना न्याय मिळवून देतात पण, साताऱ्यात पालकमंत्र्यांसमोर लसीकरणा साठी गाऱ्हाणी मांडावी लागतात, ही परिस्थिती निर्माण झाली असतानाही ‘ मी भला  ,माझी तळी उचलणारे भले’ या न्यायाने काही जण लसीकरणाची वशिलेबाजी करीत आहेत.जिल्ह्यात दररोज दोन हजाराच्या संख्येने कोविड रुग्णांची भर पडत आहे. घरी रहा, सुरक्षित रहा, नियमांचे पालन करा, काळजी घ्या, हे सर्व सांगितले जाते. पण, लस केव्हा येईल हे सांगताना दात खिळी बसत आहे का? अशी संतप्त भावना सातारा जिल्ह्यातील कोविड ग्रस्तांचे नातेवाईक विचारू लागले आहेत.ऑक्सिजन बेड, रेडमिसिविर इंजेक्शन, प्लाझ्मा याची तर अवस्था न विचारलेली बरी अशीच बनली आहे.कोविड रुग्णांची संख्या वाढल्या नंतर आता कोविड टास्क फॉर्स, कोविड सेंटरची संख्या झपाट्याने वाढत आहे.  उदघाटनाची फोटो व माहिती झळकत आहे. पण, काही ठिकाणी कोविड रुग्ण वाढत असल्याने बेड शिल्लक नाहीत. प्रथमोपचार मिळत असल्याने  रुग्णांना इतर ठिकाणी जावे लागत आहे. या गोष्टीचीही स्थानिक पातळीवर चर्चा होऊ लागली आहे. ‘जिसका कोई नही,, उसका तो खुदा है यारो’याचा ही अनुभव लोक कथन करीत आहेत. ४५वर्षपूर्वी च्या लोकांचे लसीकरण पूर्ण झाल्यानंतर १८वर्षाच्या पुढील नागरिकांचे लसीकरण केले असते तर ही वेळ आली नसती, आता दोन्ही वयोगटातील लोक लसीकरणा पासून वंचित राहिले असताना ही वशिलेबाजीतुन ज्यांनी शिफारस केली, ज्यांनी लस घेतली.त्यांची चौकशी व कारवाई झाली तरच नियमितपणे लसीकरण होऊन कोणीही वंचित राहणार नाही. अन्यथा लसी च्या नावाने सारं वशिलेबाजीत गमवावे लागले. हीच परिस्थिती पाहण्यास मिळेल अशी सातारा जिल्ह्यात भिती व्यक्त होत आहे.

सिरम इन्स्टिट्यूटचे कोविशिल्ड व भारत बायोटेक चे कोव्हवसीन या दोन लसी तुटवडा असताना वशिलेबाजी होत असल्याने त्यांच्या विरोधात चौकशी व कारवाई केली तर गरजवंतांना वेळेत लस मिळाले. पण, कारवाई होतच नसल्याचा दावा करून अनेकांनी सातारा जिल्हा प्रशासनाच्या विरोधात न्यायालयात याचिका दाखल करण्याची तयारी केली असल्याचे समजते.