पाटण:- कोरोना प्रतिबंधक लसीकरणासाठी पाटण ग्रामीण रुग्णालयात १८ ते ४४ वयाअंतर्गत नागरिकांची मोठ्या प्रमाणात आज शनिवारी सकाळी गर्दी झाली. लसीकरणासाठी ऑनलाइन नोंदणी असल्याने तालुका बाहेरील कराड, सातारा, कोरेगाव आदी तालुक्यातील नागरिकांना लसीकरणासाठी पाटण केंद्र मिळाल्याने ग्रामीण रुग्णालया बाहेर नागरिकांची सकाळपासून मोठी गर्दी होती. या गर्दीत नागरिकांची गैरसोय होऊ नये. तसेच ऑनलाइन नोंदणीतील नागरिकांना लसीकरण सुरळीत व्हावे यासाठी ग्रामीण रुग्णालया बाहेर पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.
१ मे पासून १८ वर्षावरील नागरिकांना लसीकरण सुरु होईल असे शासनाने जाहीर केले होते. मात्र कोरोना प्रतिबंधक लसीचा अपुरा पुरवठा होत असल्याने १८ वर्षावरील नागरिकांचे लसीकरण आठ दिवसापर्यंत पुढे लांबवले. या काळात ४५ वर्षावरील नागरिकांचे देखील लस उपलब्ध न झाल्याने लसीकरण झाले नाही. आज शनिवारी सकाळी पाटण ग्रामीण रुग्णालयात १८ ते ४४ वयाअंतर्गत केवळ २० कोरोना प्रतिबंधक लस उपलब्ध झाल्याने २०० जणांनाच लसीकरण होणार असल्याचे ग्रामीण रुग्णालयातून सांगण्यात आले.
या लसीकरणासाठी ऑनलाइन नोंदणी असल्याने तालुका बाहेरील कराड, सातारा, कोरेगाव आदी तालुक्यातील नागरिकांना लसीकरणासाठी पाटण केंद्र मिळाले आहे. यामुळे ग्रामीण रुग्णालया बाहेर सकाळ पासूनच नागरिकांची गर्दी जमा झाली. यावेळी नागरिकांनी ज्या ठिकाणचा रहिवासी त्या ठिकाणीच लसीकरण व्हावे अशी मागणी केली. या गर्दीत नागरिकांची गैरसोय होऊ नये. तसेच ऑनलाइन नोंदणीतील नागरिकांना लसीकरण सुरळीत व्हावे यासाठी ग्रामीण रुग्णालया बाहेर पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.
कोरोनाचा प्रादुर्भाव वाढण्याची भीती..
लसीकरणासाठी ऑनलाइन नोंदणी असल्याने तालुका बाहेरील कराड, सातारा, कोरेगाव आदी तालुक्यातील नागरिकांना लसीकरणासाठी पाटण केंद्र मिळाल्याने ग्रामीण रुग्णालया बाहेर नागरिकांची सकाळपासून मोठी गर्दी झाली होती. कराड, सातारा, कोरेगाव, आदी ठिकाणावरून आलेल्या नागरिकांमुळे कोरोनाचा प्रादुर्भाव वाढण्याची भीती व्यक्त केली जात होती.