विजय कणसे याने प्राप्त केली अमेरिकेत इंडस्ट्रीयल मँनेजमेंट पदवी

 

सातारा / प्रतिनिधी :- प्रसिद्ध स्टोन क्रशर व्यवसायिक हणमंतराव कणसे यांचे चिरंजीव विजय कणसे यांनी अमेरिकेत ओखलामा युनिव्हर्सिटी मध्ये इंडस्ट्रियल मॅनेजमेंट(MS) या विषयात उच्च शिक्षण पदवी संपादन केली. युनिव्हर्सिटीने आयोजित केलेल्या शनिवार दि.८ मे रोजी पदवीदान समारंभात ही पदवी देण्यात आली.

अंगापूर येथील हणमंतराव कणसे यांचे चिरंजीव विजय कणसे यांनी सातारच्या गुरूकुल इंग्लिश स्कूलमध्ये प्राथमिक, माध्यमिक शिक्षण पुर्ण केले . लहान पणापासून तंत्रज्ञान विकसित करण्याची आवड जोपसणाऱ्या विजय ने अमेरिकेत ओखलामा युनिव्हर्सिटीत दोन वर्षात इंडस्ट्रियल मॅनेजमेंट(MS) हि गुणवत्ता यादीत चमकत पुर्ण केली.

विजय कणसे यांने या बद्दल बोलताना सांगितले की,   तंत्रज्ञान विकसित होत असून त्याबद्दल अधिक उपयुक्त ज्ञान आत्मसात करण्यासाठी दोन वर्षे अमेरिकेत राहणार आहे. त्यानंतर देशासाठी अधिक सक्षमपणे औद्योगिक क्षेत्रातील विकासासाठी काम करण्याचे ध्येय गाठण्यासाठी प्रयत्न करणार आहे. सातारच्या गुरुकुल स्कूलमध्ये असताना व्यक्तिमत्त्व विकास आणि कौशल्य विकास करणारे उपक्रमामुळे आधुनिक तंत्रज्ञानाबाबत उत्सुकता निर्माण होत गेली होती. औद्योगिक क्षेत्रात भरपूर संधी उपलब्ध असल्याने इंडस्ट्रीयल मँनेजमेंट मध्ये करिअर करण्याचा विचार आहे.माझ्या ज्ञानाचा भविष्यात देशासाठी काही तरी करण्याचा मानस असल्याचे त्यांनी सांगितले.
वडील हणमंतराव कणसे हे क्रशर व्यवसायिक तर आई अनिता या ग्रहिणी आहेत. विविध क्षेत्रातील मान्यवरांनी विजय कणसे यांचे अभिनंदन केले.