म्हासुर्णेत लसीकरणास उत्स्फूर्त प्रतिसाद मात्र नियोजनाचा अभाव

 

 

 

म्हासुर्णे :- प्रतिनिधी तुषार माने :- म्हासुर्णे ता.खटाव येथील प्राथमिक आरोग्य उपकेंद्राच्या वतिने कोरोना लसिकरण आयोजित करण्यात आले होते. ४५ वर्षापेक्षा जास्त वयोगटातील १५० नागरिकांना लसीकरण करण्यात आले.म्हासुर्णे येथे प्रथमच लसीकरण करण्यात आले होते.त्यास म्हासुर्णे ग्रामस्थांनी चांगला प्रतिसाद दिला.मात्र प्राथमिक आरोग्य केंद्र व कोरोना दक्षता कमेठी यांचा नियोजनाचा अभाव या लसीकरणाच्या वेळी दिसुन आला.काही लोंकांनी अॉनलाईन रजिस्ट्रेशन करुन सुध्दा लसीकरण करता आले नाही कारण लस पुरवठा कमी असल्यामुळे फक्त १५० लोकांनाचा लसीकरणाचा लाभ घेता आला.कोरोना दक्षता कमेठीने नोंद केलेल्या लोंकानाच फक्त लसीकरण देण्यात आले व काही लोकांनी बाहेरुन रजिस्टेशन केले होते त्यांना मात्र लसीकरणापासुन वचिंत रहावे लागले.राज्यात संचार बंदी सुरु असताना प्रशासन सांगत आहे घराबाहेर कोणीही पडु नये मात्र काही लोक लसीकरण करण्यासाठी आरोग्य केंद्रापर्यत यावे लागले पण पदरात निराशाच लसीकरण मिळालेच नाही.लोकांचा कोरोना दक्षता कमेठी व प्राथमिक आरोग्य केंद्र यांच्या बद्दलचा नाराजीचा सुर दिसुन आला.निमसोड प्राथमिक आरोग्य केंद्र व म्हासुर्णे उपकेंद्र कर्मचारी अंगणवाडी सेविका,मदतणीस,प्राथमिक शाळेचे शिक्षक,लसीकरण यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेतले.
या लसीकरण कार्यक्रमाचा उद्घाटन समारंभ कोरोना दक्षता कमेठी अध्यक्ष सचिन माने,उपसरपंच विठ्ठल माने,ग्रामपंचायत सदस्य तुषार माने,सिकंदर मुल्ला,नलिनी कुलकर्णी,आबा यमगर,शिक्षण सल्लागार मंडळाचे चेअरमन महादेव माने,पोलीस पाटील संभाजी माने,प्राध्यापक ज्ञानेश्वर माने,मा.उपसरपंच अजित माने,आलम मुल्ला,अक्षय गायकवाड,व निमसोड प्राथमिक आरोग्य केंद्र अधिकारी डॉ.कारंडे मँडम,ए.पी.काळे मँडम,ए.जे.कुंभार साहेब व आशा सेविका व प्राथमिक शाळेचे शिक्षक यांच्या उपस्थित करण्यात आले.लसीकरणासाठी पात्र नागरिकांनी नोंदणी करावी असे आवाहन ग्रामपंचायत म्हासुर्णे व कोरोना दक्षता कमेठी म्हासुर्णे यांच्या वतीने करण्यात आले होते.
यावेळी महिला व पुरुषांची रक्तदाब ,शुगर व अॉक्सीजन लेवल तपासणी केली जात होती.तपासणी केल्यानंतर त्यात योग्य असणाऱ्या नागरिकांची परत नोंद घेवुन त्यांना लसीकरण करण्यात आले.
निमसोड प्राथमिक आरोग्य केंद्रातर्गत एकुण २३गावे असुन दररोज १५० ते २००लोकांना दररोज लसीकरण केले जात आहे.आठवड्यातुन प्रत्येक शनिवार म्हासुर्णे या गावामध्ये लसीकरण सत्र घेण्याचे नियोजन केले जात आहे.

कोरोना दक्षता कमेठी व प्राथमिक आरोग्य केंद्र यांच्या ठिसाळ कारभाराचे दर्शन या लसीकरणावेळी ग्रामस्थांना दिसुन आले गावातील ग्रामस्थांनी कोरोना दक्षता कमेठीच्या लसीकरणाच्या आवाहानास उत्स्फुर्त प्रतिसाद दिला मात्र नियोजनाच्या आभावामुळे लोकांच्यातुन नाराजीचा सुर आला तरी येथुन पुढील लसीकरणाच्या वेळी तरी नियोजन व्यवस्थित करावे अशी मागणी ग्रामस्थाच्या वतीने करण्यात येत आले

शिवभक्त अक्षय गायकवाड