Friday, June 20, 2025
Homeठळक घडामोडीरान मांजराची शिकार प्रकरणी दोघे वनविभागाच्या ताब्यात

रान मांजराची शिकार प्रकरणी दोघे वनविभागाच्या ताब्यात

सातारा :  शनिवारी रात्री महेश पाटील वनक्षेत्रपाल सातारा यांच्या मार्गदर्शनाखाली शंकर आवळे वनपाल सातारा, सुहास भोसले वनरक्षक सातारा, मारुती माने वनरक्षक कण्हेर, अमर शिंदे वनरक्षक धावली, गोरख शिडतुरे वनमजूर सातारा यांनी सापळा रचून मौजे गोवे येथे 3.45 वाजता  रान मांजराची शिकार केलेले गौतम सुरेश जाधव व सुनिल राजाराम गोसावी असे दोन आरोपी एक मृत वनमांजर व सहा शिकारीचे सापळे ताब्यात घेतले. सदर आरोपींना न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने दोन दिवसाची वन कोठडी दिली.
रानमांजराचे पशु वैद्यकीय अधिकार्‍यांनी शवविच्छेदन केल्यानंतर गोडोली येथील रोपवाटिकेत दहन करण्यात आले.
Chandrasen Jadhav
Chandrasen Jadhavhttp://GramodhharNews.com
Continuing family legacy of Dainik Gramodhhar Chandrasen Jadhav has been associated with it since last 6 years. He is the Chief Editor & looks after Online News Edition of GramodhharNews.com operated from Satara.
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular