रहिमतपूर, दि. २२ :- दुर्गळवाडी (ता. कोरेगाव) येथे अज्ञात वाहनाने विनापरवाना आल्यावरुन युवतीवर रहिमतपूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. याबाबतची फिर्याद तलाठी पृथ्वीराज शिवराज पाटील यांनी दिली.
निकिता आबासो यादव (वय १९) रा. दुर्गळवाडी, ता.कोरेगाव हिने कोविड – १९ या विषाणू रोगाचा प्रादुर्भाव व संसर्ग होईल, हे माहीत असताना सुध्दा विनापरवाना जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाचे उल्लघंन करुन अज्ञात वाहनाने दुर्गळवाडी येथे आली आहे. म्हणून यांच्यावर गुन्हा दाखल करणेत आला आहे. या घटनेचा तपास पोलीस नाईक जे.जी भुजबळ करीत आहेत.
अज्ञात वाहनाने विनापरवाना आल्यामुळे दुर्गळवाडी च्या युवतीवर गुन्हा दाखल
RELATED ARTICLES