मेढा ( वार्ताहर ) :- कोणत्याही प्रकारची परवानगी न घेता साग वाहतुक करणारे मालट्रकवर वन विभागाने कारवाई केली.
याबाबत अधिक मिळालेली माहिती अशी की वन विभाग कर्मचारी आपली सेवा आनेवाडी मार्गावर बजावत असताना सागाची वाहतुक करणारा ट्रक संशयरित्या आढळून आला. या ट्रकमध्ये विना शिक्याचा साग भरला गेला होता. याबाबत विचारणा केली असता कोणतीही परवानगी न घेता हा माल भरला गेला असल्याचे समजताच हा ट्रक मुद्देमालासह मेढा येथिल वनविभाग ऑफिसकडे वळविण्यात आला.
या कारवाईत साडेचार लाखाचा मुद्देमाल जप्त केल्याची माहिती वनक्षेत्रपाल आर.एस. परदेशी यांनी दिली. या गुन्ह्याचा तपास उपवन संरक्षक एम.एन. मोहिते, सहा. उपवनसंरक्षक गोसावी यांच्या मार्गदर्शनाखाली वनक्षेत्रपाल परदेशी, वनपाल आर.ए. परधाने, वनरक्षक पी.एस. फुलवरे , एन.एन. रजपूत, वनमजुर पी.एम. मर्देकर, यांनी उघडकीस आणला.
विना परवाना साग वाहतुक प्रकरणी वन विभागाची कारवाई ; चार लाख पन्नास हजाराचा मुद्देमाल जप्त
RELATED ARTICLES