सातारा : महाराष्ट्र, गुजरात व कर्नाटक राज्यात 42 घरफोड्या करणारी टोळी स्थानिक गुन्हे शाखेने जेरबंद केली आहे.
17 नोव्हेंबर रोजी पोलीस निरिक्षक घनवट यांना माहिती मिळाली की, शिवराज तिकाटणे येथे पाच इसम संशयितरित्या फिरत आहेत. त्यांनी लागलीच पो.उ.नि. गजानन मोरे, सागर गवसणे यांना कारवाईचे आदेश दिले. त्यानुसार पोलिसांनी या पाच जणांना ताब्यात घेतले. त्यांनी सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर, रत्नागिरी, रायगड जिल्ह्यात घरफोड्या, चोर्या केल्याचे कबूल केले. तसेच गुजरात व कर्नाटक राज्यातही घरफोड्या अशा एकूण 42 ठिकाणी चोर्या केल्याचे कबूल केले. या गुन्हेगारांना कराड शहर व ढेबेवाडी पोलीस ठाण्याच्या गुन्ह्यांमध्ये अटक करण्यात आली आहे.
ही कारवाई पो.नि. घनवट, गजानन मोरे, सागर गवसणे, विजय जाधव, विलास नागे, संजय पवार व कर्मचार्यानी पार पाडली.