वडूज/प्रतिनीधी: कातरखटाव (ता .खटाव) गावचे हद्दीतील निसर्ग ढाबा येथून बारामती पोलिसांच्या ताब्यातील आरोपी हात धुण्याच्या बहाण्याने फरार झाला.
याबाबतची माहिती अशी, प्रताप सुभराव जाधव (वय:34)
रा.मोराळे ता.तासगांव जि सांगली हल्ली मु.पिंपळी ता. बारामती जि.पुणे हा आरोपी लहान मुलाच्या अपहरण प्रकरनी बारामती मोराळे (तासगाव) येथे नेण्यात आले होते. तेथून परत येत असताना गुरुवारी रात्री दहा च्या सुमारास पोलीस निसर्ग धाब्यावर जेवण करण्यासाठी गेले होते.यावेळी हात धुण्याचा बहाणा करुन पोना 2502 कदम यांचे हाताला हिसका देवुन त्यांना ढकलुन देवुन निसर्ग ढाब्याचे पाठीमागील बाजुस अंधाराचा फायदा घेवुन तो पळाला. त्याचा पोलीस स्टाफ, पंच यांचेव्दारे पाठलाग करुन पकडण्याचा प्रयत्न केला असता तो अंधाराचा फायदा घेवुन पळुन गेला. म्हणुन प्रताप जाधव याचे विरुध्द भारतीय न्याय संहिता 262प्रमाणे सरकरातर्फे वडूज पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल करण्यात आली आहे. पोलीस निरीक्षक घनशाम सोनवणे यांचे मार्गदर्शनाखाली हवालदार एस. एल. खाडे अधिक तपास करीत आहेत.